इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा थरार २२ मार्चपासून सुरू होणार आहे. या मोसमातील पहिला सामना महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली यांच्यात होणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील हा सामना चेपॉक स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
दरम्यान, यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहली, धोनी आणि रोहित शर्मा या खेळाडूंसाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये एक खास कॅमेरा असणार आहे. या कॅमेऱ्याला हिरो कॅम नाव देण्यात आले असून हा 'हीरो कॅम' विराट-धोनीसारख्या महत्वाच्या खेळाडूंच्या प्रत्येक हालचालीचा मागोवा घेणार आहे. हा कॅमेरा प्रत्येक सामन्यादरम्यानच हेच काम करेल.
वास्तविक, चाहत्यांची मजा द्विगुणित करण्यासाठी जिओ सिनेमाने हिरो कॅमची व्यवस्था केली आहे. या कॅमेऱ्यामुळे सामन्यादरम्यान मोठ्या खेळाडूंवर नजर राहणार आहे. हा कॅमेरा प्रत्येक क्षणोक्षणी त्यांच्या हालचालींचा मागोवा घेईल. आयपीएल सामन्यादरम्यान ५० पेक्षा जास्त कॅमेरे वापरले जातात. आपण कल्पनाही करू शकत नाही अशा ठिकाणी हे कॅमेरे बसवले आहेत. मैदानावर पंचांच्या टोपीपासून ते स्टंपपर्यंत अनेक ठिकाणी कॅमेरे बसवले आहेत.
IPL २०२४ चे जियो सिनेमावर (Jio Cinema) वर फ्रीमध्ये थेट प्रक्षेपण होणार आहे. या हंगामात आतापर्यंत केवळ २१ सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएल २०२४ च्या उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही.
आयपीएलचा पहिला सामना (२२ मार्च) चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात खेळला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल.
सीएसके आणि आरसीबी यांच्यातील उद्घाटनाच्या सामन्यापूर्वी एक धमाकेदार प्रोमो लॉंच करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये बॉलिवूड स्टार अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफही दिसत आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्याचा प्रोमो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच, काही वेळातच हा प्रोमो चाहत्यांना चांगलाच आवडल्याचे दिसत आहे.
संबंधित बातम्या