India vs Australia 4th Test : मेलबर्नमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटीला आजपासून (२६ डिसेंबर) सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल करण्यात आले आहेत.
सलामीवीर नॅथन मॅकस्विनीच्या जागी १९ वर्षीय सॅम कॉन्स्टॅटने पदार्पण केले. तर जोश हेझलवूडच्या जागी स्कॉट बोलंडचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला.
यानंतर ऑस्ट्रेलियन सलामीवीरांनी सावध सुरुवात केली. मात्र त्यानंतर पदार्पण करणारा १९ वर्षीय सॅम कॉन्स्टास याने टी-20 स्टाइल फलंदाजी केली. पहिल्या ६ षटकात ऑस्ट्रेलियाच्या केवळ ६ धावा होत्या. पण ११ षटकेहोईपर्यंत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ६६ पर्यंत पोहोचली होती.
या सामन्यात सॅम कोन्स्टासने स्फोटक फलंदाजी केली. पहिल्या १८ चेंडूत त्याच्या बॅटमधून फक्त २ धावा आल्या. त्याने आपले सर्व चेंडू जसप्रीत बुमराहविरुद्ध खेळले. पण त्यानंतर कॉन्स्टासने आपला शो सुरू केला.
१९ वर्षीय कॉन्स्टास याने जसप्रीत बुमराहविरुद्ध काही उत्कृष्ट शॉट्स मारले. डावाच्या सातव्या षटकात, जसप्रीत बुमराहच्या विरोधात कॉन्स्टासने स्विच हिटद्वारे २ आणि १ षटकार मारला.
त्यानंतर ११ व्या षटकात बुमराहच्या षटकात कॉन्स्टासने एकूण १८ धावा ठोकल्या. कॉन्स्टासने आपली झंझावाती फलंदाजी सुरू ठेवत अवघ्या ५२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
ऑस्ट्रेलियाच्या डावातील दहाव्या षटकानंतर मेलबर्न क्रिकेट मैदानावरील वातावरण तापले होते. सॅम कॉन्स्टॅस आणि विराट कोहली यांच्यात जोरदार वाद झाला. खेळपट्टीच्या मध्यभागी कोहली आणि कोन्स्टॅस एकमेकांना धडकले.
यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये वाद सुरू झाला. प्रकरण शांत करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दुसरा सलामीवीर उस्मान ख्वाजासह पंचांना हस्तक्षेप करावा लागला.
सॅम कॉन्स्टास ६६ चेंडूत ६० धावा करून बाद झाला. त्याला रवींद्र जडेजाने पायचीत केले. त्याने आपल्या खेळाडूत ६ चौकार आणि २ षटकार लगावले. हे वृत्त लिहिपर्यंत ऑस्ट्रेलियाने एक बाद ९० धावा केल्या होत्या. उस्मान ख्वाजा आणि मार्नस लॅब्युशेन क्रीजवर होते.
संबंधित बातम्या