IPL Fastest Century: आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक कोणी झळकावलं? जाणून घ्या टॉप ५ खेळाडूंची नावे
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL Fastest Century: आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक कोणी झळकावलं? जाणून घ्या टॉप ५ खेळाडूंची नावे

IPL Fastest Century: आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक कोणी झळकावलं? जाणून घ्या टॉप ५ खेळाडूंची नावे

Apr 15, 2024 10:07 PM IST

ट्रॅव्हिस हेडने रॉयल चॅलेंजर्सविरुद्ध बंगळुरूविरुद्ध सामन्यात अवघ्या ३९ चेंडूत शतक झळकावून आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत समावेश केला आहे.

आयपीएलध्ये सर्वात वेगवान शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ट्रेव्हिस हेडचा समावेश झाला आहे.
आयपीएलध्ये सर्वात वेगवान शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ट्रेव्हिस हेडचा समावेश झाला आहे. (AP)

IPL 2024: आयपीएल २०२४ मधील ३०व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा तडाखेबाज फलंदाजी ट्रेव्हिस हेडने वेगवान शथक झळकावत नव्या विक्रमाला गवसणी घातली. हेडने अवघ्या २० चेंडूत अर्धशतक झळकावत पॉवरप्लेमध्ये आरसीबीच्या गोलंदाजावर वर्चस्व गाजवले. यानंतर हेडने आयपीएलमधील आपले पहिले शतक झळकावले. आयपीएलच्या २०२४ च्या हंगामात अनेक विक्रम मोडत एसआरएचचा सलामीवीर हेडने स्पर्धेच्या इतिहासातील चौथ्या क्रमांकाचे वेगवान शतक झळकावले.

आयपीएलमधील सर्वात वेगवान शतक

५)अ‍ॅडम गिलख्रिस्ट

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज यष्टीरक्षक-फलंदाज अ‍ॅडम गिलख्रिस्ट शतकवीरांच्या एलिट यादीत एकमेव ऑस्ट्रेलियन फलंदाज आहे. पंजाब किंग्ज इलेव्हनकडून खेळताना माजी स्टारने आयपीएलच्या पहिल्या हंगामात मुंबई इंडियन्सविरुद्ध ४२ चेंडूत शतक झळकावले.

MI vs CSK : बाऊचर आणि पोलार्डचा चौथ्या अंपायरसोबत राडा, दोघेही थेट मैदानात घुसले, नेमकं काय घडलं? पाहा

४) ट्रेव्हिस हेड

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्यात हैदराबादकडून आयपीेएलमधील सर्वात वेगवान दुसरे शतक झळकावले. हेडने ४१ चेंडूत १०२ धावांची शानदार खेळी केली. यात नऊ चौकार आणि आठ षटकार लगावले.

३) डेव्हिड मिलर

गुजरात टायटन्सचा सुपरस्टार डेव्हिड मिलरने मोहालीत आरसीबीविरुद्ध सनसनाटी शतक पूर्ण करण्यासाठी ३८ चेंडू घेतले. पंजाब किंग्जकडून खेळताना माजी स्टारने टी-२० स्पर्धेच्या २०१३च्या हंगामात ही कामगिरी केली. मिलरने ३८ चेंडूत नाबाद १०१ धावा केल्या. आयपीएलमधील हे तिसरे सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले.

RCB vs SRH Head to Head: आरसीबी- एसआरएच आज एकमेकांशी भिडणार; जाणून घ्या संभाव्य संघ आणि हेड टू हेड रेकॉर्ड

२) युसूफ पठाण

भारताचा माजी फलंदाज युसूफ पठाणने २०१० मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध ३७ चेंडूत शतक झळकावले होते. ब्रेबॉर्न येथे २००८ च्या विजेत्या संघावर मुंबई इंडियन्सने चार धावांनी विजय मिळवला तेव्हा पठाण ३७ चेंडूत १०० धावांवर बाद झाला होता. आरआरचा माजी फलंदाज पठाणला त्याच्या संस्मरणीय शतकासाठी सामनावीर घोषित करण्यात आले.

१) ख्रिस गेल

वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ख्रिस गेलने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक झळकावले. आरसीबीच्या माजी स्टारने अवघ्या ३० चेंडूत विक्रमी शतकाची नोंद केली. गेलने आयपीएलच्या २०२३ च्या हंगामात पुणे वॉरियर्सविरुद्ध विक्रमी शतक झळकावले होते. गेलने पुण्याच्या फ्रँचायझीविरुद्ध ६६ चेंडूत नाबाद १७५ धावांची खेळी केली.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग