'या' धडाकेबाज गोलंदाजाची भारतीय संघात एन्ट्री, आयपीएलमध्ये आपल्या संघाला जिंकून दिलीय ट्रॉफी
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  'या' धडाकेबाज गोलंदाजाची भारतीय संघात एन्ट्री, आयपीएलमध्ये आपल्या संघाला जिंकून दिलीय ट्रॉफी

'या' धडाकेबाज गोलंदाजाची भारतीय संघात एन्ट्री, आयपीएलमध्ये आपल्या संघाला जिंकून दिलीय ट्रॉफी

Oct 30, 2024 01:51 PM IST

IND vs NZ 3rd Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात शुक्रवारीपासून तिसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे.

'या' धडाकेबाज गोलंदाजाची भारतीय संघात एन्ट्री
'या' धडाकेबाज गोलंदाजाची भारतीय संघात एन्ट्री

India vs New Zealand: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात येत्या १ नोव्हेंबरपासून तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होत आहे. हा सामना मुंबईत खेळला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर भारताचा युवा गोलंदाज हर्षित राणाचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. याआधीही तो भारतीय संघासोबत प्रवास करत होता.पण नंतर त्याला रणजी ट्रॉफीसाठी सोडण्यात आले. मात्र, आता त्याचा पुन्हा संघात समावेश करण्यात आला. यामुळे मुंबईत रंगणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यातून हर्षित राणाला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळेल, अशी शक्यता आहे.

न्यूझीलंडने मालिकेत २-० अशी अजेय आघाडी घेतली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात शुक्रवारी खेळला जाणारा सामना औपचारिक असेल. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहा विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. तसेच त्याच्या जागी हर्षित राणाची संघात निवड केली जाऊ शकते. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी हार्षित राणाची निवड करण्यात आली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात निवड झाल्यानंतर त्याने चांगली कामगिरी केल्यास ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये त्याचा समावेश केला जाऊ शकतो.

आयपीएल २०२४ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळताना हार्षित राणाने १३ सामन्यात १९ विकेट्स संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. यशिवाय, देशांतर्गत क्रिकेटमधेही त्याने दमदार कामगिरी केली. नुकत्याच रणजी ट्रॉफीमध्ये त्याने पाच विकेट्स घेतल्या आहेत. भारताने खेळलेल्या मागील तीन एकदिवसीय मालिकेत तो भारतीय संघाचा भाग होता. परंतु, त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही. पण आता या युवा वेगवान गोलंदाजाचा संघात समावेश होऊ शकतो, असे मानले जात आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाज म्हणून आकाश दीपच्या जागी मोहम्मद सिराज खेळू शकतो.

भारताविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी न्यूझीलंडचा संघ भारतात आला. या मालिकेतील पहिल्या सामन्यात लाजिरवाण्या पराभवाला सामोरे गेल्यानंतर भारतीय संघ दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवून पुनरागमन करेल, अशी अपेक्षा होती. परंतु, तसे झाले नाही. दुसऱ्या सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह भारताने मालिकाही गमावली. भारताने मायदेशात सलग १८ मालिका आणि ४ हजार ३३२ दिवसानंतर कसोटी मालिकेत गमावली आहे. भारताला २०१२ नंतर मायदेशात कसोटी मालिकेत पराभूत करणारी न्यूझीलंड पहिला संघ ठरला. भारताने २०१२ मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका गमावली होती.

Whats_app_banner