Ranji Trophy : टीम इंडियात निवड होताच हर्षित राणानं दाखवली जादू, रणजी ट्रॉफीच्या सामन्यात काय घडलं? पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ranji Trophy : टीम इंडियात निवड होताच हर्षित राणानं दाखवली जादू, रणजी ट्रॉफीच्या सामन्यात काय घडलं? पाहा

Ranji Trophy : टीम इंडियात निवड होताच हर्षित राणानं दाखवली जादू, रणजी ट्रॉफीच्या सामन्यात काय घडलं? पाहा

Oct 28, 2024 05:47 PM IST

Harshit Rana in Ranji Trophy Match : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झालेल्या हर्षित राणाने रणजी ट्रॉफीमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने गोलंदाजीत ५ विकेट घेतले आणि फलंदाजीत अर्धशतक झळकावले.

Ranji Trophy : टीम इंडियात निवड होताच हर्षित राणानं दाखवली जादू, रणजी ट्रॉफीच्या सामन्यात काय घडलं? पाहा
Ranji Trophy : टीम इंडियात निवड होताच हर्षित राणानं दाखवली जादू, रणजी ट्रॉफीच्या सामन्यात काय घडलं? पाहा (PTI)

टीम इंडियाला नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची असून त्यासाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माला कर्णधार बनवण्यात आले आहे. तर जसप्रीत बुमराहकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे.

युवा गोलंदाज हर्षित राणा यालाही पहिल्यांदाच कसोटी संघात स्थान मिळाले आहे. टीम इंडियात निवड होताच त्याने रणजी ट्रॉफीमध्ये अप्रतिम कामगिरी केली असून आपल्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे.

हर्षित राणाने गोलंदाजी करताना ५ बळी घेतले

रणजी ट्रॉफीमध्ये दिल्ली संघाकडून खेळताना हर्षित राणाने आसामविरुद्ध अप्रतिम गोलंदाजी केली आहे. त्याने १९.३ षटकांत ८० धावांत ५ बळी घेतले आणि आसामच्या फलंदाजांसाठी तो डोकेदुखी ठरला. हर्षितचे चेंडू खेळणे त्यांच्या फलंदाजांना खूप कठीण झाले. आसाम संघाने पहिल्या डावात ३३० धावा केल्या.

हर्षित राणाने फलंदाजीत अर्धशतक केले

गोलंदाजीनंतर हर्षित राणाने फलंदाजीतही कमाल केली आणि उत्कृष्ट अर्धशतक झळकावले. त्याने ७८  चेंडूत ५९ धावा केल्या, ज्यात ४ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. खालच्या फळीत येत त्याने फलंदाजीचे उत्कृष्ट फलंदाजी केली. त्याच्याकडून एवढ्या उत्कृष्ट फलंदाजीची कोणालाच अपेक्षा नव्हती. त्याच्यामुळेच दिल्ली संघाला ४०० धावांचा टप्पा पार करता आला.

हर्षित राणा आयपीएलमध्ये केकेआर संघाचा भाग

हर्षित राणाने आतापर्यंत २० आयपीएल सामन्यांमध्ये एकूण २५ विकेट घेतल्या असून तो आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळतो. तो आतापर्यंत केवळ ९ प्रथम श्रेणी सामने खेळला आहे, ज्यामध्ये त्याने ३६ बळी घेतले आहेत. त्याने लिस्ट-ए मध्ये २२ विकेट्स घेतल्या आहेत. त्याची उत्कृष्ट कामगिरी पाहून त्याची बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी निवड झाली आहे.

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.

राखीव : मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद.

Whats_app_banner