गौतम गंभीरच्या कोचिंगमध्ये भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियात पराभव झाला. त्याआधी न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेतही भारताचा सुपडा साफ झाला होता. त्यामुळे गंभीरवर बरीच टीका होत आहे.
या दरम्यान, टीम इंडियाचा माजी फलंदाज आणि केकेआरमधील गंभीरचा सहकारी मनोज तिवारी हा देखील गौतम गंभीर याच्याबबात खूप काही टाकीत्मक बोलला आहे.
यानंतर आता भारतीय संघाचा युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणा गंभीरच्या समर्थनार्थ पुढे आला आहे.
हर्षित राणाने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर गौतम गंभीरचा फोटो शेअर केला आहे. यात त्याने लिहिले की, 'वैयक्तिक असुरक्षिततेमुळे एखाद्यावर टीका करणे योग्य नाही. गौती भैया स्वतःपेक्षा इतरांचा जास्त विचार करतात. जेव्हा खेळाडू वाईट काळातून जात असतात तेव्हा ते त्यांना नेहमीच साथ देतात. हे त्यांनी अनेक प्रसंगी केले आहे. खेळाला आपल्या बाजूने कसे वळवायचे हे त्यांना माहीत आहे.
मनोज तिवारी मनोज तिवारीने गौतम गंभीरला ढोंगी म्हटले आहे. मनोज म्हणाला, 'गौतम गंभीर हा ढोंगी आहे. तो जे सांगतो ते करत नाही. कर्णधार (रोहित) कुठला आहे, मुंबईचा. अभिषेक नायर कुठला आहे? मुंबईचा. त्याला मुंबईच्या खेळाडूंना पुढे करण्याची संधी मिळाली.
जलज सक्सेना याच्यासाठी बोलणारे कोणी नाही. तो चांगली कामगिरी करतो, पण शांत राहतो. मॉर्ने मॉर्केल लखनौ सुपरजायंट्समधून आला आहे. अभिषेक नायर कोलकाता नाईट रायडर्समध्ये गंभीरसोबत होता. जो गंभीरसोबत चांगले राहतो, ते त्यांना पुढे आणतो."
हर्षित राणाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पर्थ कसोटीत पदार्पण केले होते. तो गंभीरच्या जवळचा मानला जातो. आयपीएल २०२४ मध्ये, तो कोलकाता नाइट रायडर्सचा भाग होता आणि गंभीर संघाचा मार्गदर्शक होता. अॅडलेडमधील दिवस-रात्र कसोटीनंतर हर्षित राणाला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले.
संबंधित बातम्या