Harry Brook : इंग्लंडच्या हॅरी ब्रुकचं आणखी एक शतक, डॉन ब्रॅडमन यांचा हा मोठा विक्रम मोडला
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Harry Brook : इंग्लंडच्या हॅरी ब्रुकचं आणखी एक शतक, डॉन ब्रॅडमन यांचा हा मोठा विक्रम मोडला

Harry Brook : इंग्लंडच्या हॅरी ब्रुकचं आणखी एक शतक, डॉन ब्रॅडमन यांचा हा मोठा विक्रम मोडला

Dec 06, 2024 10:01 AM IST

Harry Brook Hundred Vs Nz : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात वेलिंग्टन येथे कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडचा युवा स्टार हॅरी ब्रुक याने शतक ठोकले आहे. यासह त्याने सर्वात जलद ८ कसोटी शतक करण्याचा पराक्रम केला आहे.

Harry Brook : इंग्लंडच्या हॅरी ब्रुकचं आणखी एक शतक, डॉन ब्रॅडमन यांचा हा मोठा विक्रम मोडला
Harry Brook : इंग्लंडच्या हॅरी ब्रुकचं आणखी एक शतक, डॉन ब्रॅडमन यांचा हा मोठा विक्रम मोडला (AP)

न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने जिंकला होता, तर आजपासून (६ डिसेंबर) वेलिंग्टनच्या मैदानावर दोन्ही संघांमध्ये मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात पुन्हा एकदा हॅरी ब्रूकच्या बॅटने धुमाकूळ घातला आहे.

हॅरी ब्रुकने इंग्लंडसाठी पहिल्या डावात शतक ठोकले. त्याने १२३ धावांची खेळी केली. सोबतच एक विक्रम रचला. ब्रुकने कसोटी कारकिर्दीतील अवघ्या २३व्या कसोटी सामन्यात ८वे शतक झळकावले. या शतकासह ब्रुकने या बाबतीत अनेक महान खेळाडूंना मागे टाकले आहे.

ब्रूक जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा इंग्लंडच्या संघाची अवस्था खूपच वाईट होती, ४३ धावांवर त्यांचे ४ खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतले होते, इथून ब्रूकने इंग्लंड संघाच्या डावाची धुरा सांभाळली.

कसोटीत सर्वात जलद ८ शतके करणारा ब्रूक ९वा फलंदाज

हॅरी ब्रूकने २०२४ या वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे, ज्यामध्ये त्याने या वर्षात आतापर्यंत १ हजार कसोटी धावा केल्या आहेत. हॅरी ब्रूक हा डॉन ब्रॅडमनच्या दिग्गजांच्या यादीत सामील होऊन कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद ८ शतके झळकावणारा फलंदाज बनला आहे.

ब्रूकने आपल्या कसोटी कारकिर्दीतील ३८व्या डावात हा पराक्रम केला. यासह, तो २०२४ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण करणारा चौथा फलंदाज बनला आहे, ज्यामध्ये त्याच्याआधी जो रूट, यशस्वी जैस्वाल आणि बेन डकेट यांनी ही कामगिरी केली होती.

परदेशी भुमीवर कमी डावात सर्वाधिक शतकं

हॅरी ब्रूकची परदेशी भूमीवर कसोटी कारकिर्दीतील ही १६वी कसोटी खेळी होती, ज्यामध्ये तो सर्वाधिक शतके करणारा खेळाडू ठरला आहे. असे करून त्याने डॉन ब्रॅडमन यांना मागे टाकले आहे. डॉन ब्रॅडमन यांनी परदेशी भूमीवर १६ डावांत ६ शतके झळकावली होती.

इंग्लंडचा पहिला डाव २८० धावांवरच आटोपला

वेलिंग्टन कसोटी सामन्यात, इंग्लंड संघाचा पहिला डाव २८० धावांवर संपुष्टात आला, ज्यामध्ये हॅरी ब्रूकने १२३ धावा केल्या आणि ऑली पोपने ६६ धावा केल्या.

याशिवाय इंग्लंड संघाच्या अन्य कोणत्याही फलंदाजाला २० धावांचा टप्पा ओलांडण्यात यश आले नाही. किवी संघाकडून गोलंदाजीत नॅथन स्मिथने ४, विल्यम ओ'रुर्कने ३ तर मॅट हेन्रीने २ विकेट्स घेतल्या.

Whats_app_banner

संबंधित बातम्या