टीम इंडियाची स्टार क्रिकेटर हरलीन देओल हिने स्फोटक कामगिरी करत शतक झळकावले आहे. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. हरलीनने मंगळवारी (२४ डिसेंबर) मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावले. तिने १०३ चेंडूंचा सामना करताना ११५ धावांची खेळी खेळली.
हरलीनच्या दमदार खेळीमुळे टीम इंडियाने ५० षटकात ५ बाद ३५८ धावांचा टप्पा गाठला. हरलीनसह प्रतिका रावल आणि स्मृती मानधना यांनीही चांगली फलंदाजी केली.
हरलीन या एकदिवसीय सामन्यात भारतासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आली होती. या डावात तिने चेंडूंचा सामना करत ११५ धावा केल्या. हरलीनच्या या खेळीत १६ चौकारांचा समावेश होता.
हरलीनने जेमिमाह रॉड्रिग्जसोबत चांगली भागीदारी केली. जेमिमा ५२ धावा करून बाद झाली. तिने ३६ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकार लगावला.
हरलीनची एकदिवसीय कारकीर्द बघितली तर ती फार मोठी नाही. हरलीनने आतापर्यंत १५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. या कालावधीत ४३६ धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने एक शतक आणि २ अर्धशतके झळकावली आहेत. वडोदरात हरलीनने ११५ धावांची खेळी केली. तिच्या वनडे कारकिर्दीतील ही सर्वात मोठी धावसंख्या आहे.
वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला ३५९ धावांचे लक्ष्य दिले आहे. हरलीनच्या खेळीच्या जोरावर भारताने ३५० धावांचा टप्पा पार केला. हरलीनसोबतच मंधाना, प्रतिका रावल आणि जेमिमा यांनी दमदार परफॉर्मन्स दिला. मंधानाने ४७ चेंडूत ५३ धावा केल्या. प्रतिकाने ८६ चेंडूंचा सामना करत ७६ धावा केल्या. जेमिमाने ५२ धावांची खेळी खेळली.
संबंधित बातम्या