Aus vs Pak : हारिस रौफने ऑस्ट्रेलियात इतिहास रचला, असा पराक्रम करणारा पहिलाच पाकिस्तानी गोलंदाज
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Aus vs Pak : हारिस रौफने ऑस्ट्रेलियात इतिहास रचला, असा पराक्रम करणारा पहिलाच पाकिस्तानी गोलंदाज

Aus vs Pak : हारिस रौफने ऑस्ट्रेलियात इतिहास रचला, असा पराक्रम करणारा पहिलाच पाकिस्तानी गोलंदाज

Nov 08, 2024 01:31 PM IST

Haris Rauf Aus vs Pak ODI : पाकिस्तानच्या हरिस रौफने ऑस्ट्रेलियात नवा विक्रम केला आहे. रौफने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अनोखा विक्रम आपल्या नावावर केला.

Haris Rauf : हारिस रौफने ऑस्ट्रेलियात इतिहास रचला, असा पराक्रम करणारा पहिलाच पाकिस्तानी गोलंदाज
Haris Rauf : हारिस रौफने ऑस्ट्रेलियात इतिहास रचला, असा पराक्रम करणारा पहिलाच पाकिस्तानी गोलंदाज (AFP)

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. पहिला सामना जिंकल्यानंतर यजमान ऑस्ट्रेलिया मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. आता आज (८ नोव्हेंबर) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दोन्ही संघ ॲडलेड ओव्हलवर आमनेसामने आहेत. 

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन फलंदाजांची अतिशय वाईट अवस्था झाली. पाकिस्तानी गोलंदजांसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाज एक-एक धाव काढण्यासाठी धडपडताना दिसले. एकाही फलंदाजाने क्रीझवर स्थिरावण्याची तसदी घेतली नाही, परिणामी संपूर्ण संघ अवघ्या ३५ षटकांत गडगडला. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथ याने सर्वाधिक धावा केल्या. ४८ चेंडूंचा सामना करताना स्मिथने ५ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ३५ धावांची खेळी केली.

त्याच्याशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला २० धावांचा टप्पाही स्पर्श करता आला नाही. अशाप्रकारे ऑस्ट्रेलिया १६५ धावांवर ऑलआऊट झाला.

एवढ्या कमी धावसंख्येवर ऑस्ट्रेलियाला बाद करण्याचे श्रेय पाकिस्तानच्या उत्कृष्ट वेगवान गोलंदाजीला जाते, ज्यांनी पहिल्याच षटकापासून कसून गोलंदाजी केली आणि यजमान संघाच्या एकाही फलंदाजाला क्रीझवर स्थिरावू दिले नाही. पाकिस्तानसाठी सर्वच गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली असली तरी हरिस रौफने ५ विकेट घेत आश्चर्यकारक कामगिरी केली.

रौफने जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, ॲरॉन हार्डी, ग्लेन मॅक्सवेल आणि पॅट कमिन्स यांना आपले बळी बनवले. या वेगवान गोलंदाजाने ८ षटकात ३५ धावा देत अर्ध्या ऑस्ट्रेलियन संघाला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. या चमकदार कामगिरीमुळे हरिस रौफने इतिहास रचला.

ऑस्ट्रेलियात नवा विक्रम रचला

वास्तविक, ॲडलेड ओव्हल येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात ५ विकेट घेणारा हारिस रौफ हा पहिला पाकिस्तानी वेगवान गोलंदाज आहे. एकंदरीत अशी कामगिरी करणारा तो दुसरा पाकिस्तानी गोलंदाज ठरला आहे. याआधी फिरकीपटू सकलेन मुश्ताकने याच मैदानावर १९९६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ बळी घेण्याचा पराक्रम केला होता.

एवढेच नाही तर या मैदानावर ५ बळी घेणारा हारिस हा तिसरा पाकिस्तानी गोलंदाज ठरला आहे. ॲडलेड ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात हरिस आणि सकलेनने ही मोठी कामगिरी केली तर सोहेल खानने भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियात अशी मोठी कामगिरी केली.

Whats_app_banner