मुंबई इंडियन्सच्या कॅप्टन्सीमुळे हार्दिकची पत्नी ट्रोलर्सच्या निशाण्यावर, फोटोंवर अश्लील कमेंट्स-hardik pandyas wife natasa stankovic trolls on social media amid mumbai indians captaincy in ipl 2024 ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  मुंबई इंडियन्सच्या कॅप्टन्सीमुळे हार्दिकची पत्नी ट्रोलर्सच्या निशाण्यावर, फोटोंवर अश्लील कमेंट्स

मुंबई इंडियन्सच्या कॅप्टन्सीमुळे हार्दिकची पत्नी ट्रोलर्सच्या निशाण्यावर, फोटोंवर अश्लील कमेंट्स

Mar 29, 2024 05:43 PM IST

Mumbai indians Captaincy : नताशा स्टेनकोविच पंड्याच्या इन्स्टाग्राम पेजवर ३.७ मिलियन्सहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती नियमितपणे तिच्या चाहत्यांसाठी व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते.

Hardik Pandya and Natasa Stankovic got married in January 2020.
Hardik Pandya and Natasa Stankovic got married in January 2020. (Instagram)

Hardik Pandya's Wife Natasa Stankovic : आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सने आतापर्यंत दोन सामने खेळले असून दोन्ही सामने गमावले आहेत. पाचवेळचा चॅम्पियन असलेल्या मुंबईने यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत तरी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केलेली नाही.

विशेष म्हणजे, मुंबईच्या खराब कामगिरीचे खापर कर्णधार हार्दिक पांड्यावर फोडले जात आहे. आयपीएलच्या दोन महिनेआधी मुंबई इंडिन्सच्या मॅनेजमेंटने रोहित शर्माच्या जागी हार्दिकला कॅप्टन बनवले. पण हा निर्णय चाहत्यांना आवडला नाही. हार्दिक कर्णधार झाल्यापासून चाहते त्याला सतत ट्रोल करत आहेत.

हार्दिकसोबतच आता क्रिकेट चाहते त्याची पत्नी नतासा स्टॅनकोविच हिलादेखील ट्रोल करत आहेत. नताशा स्टेनकोविच पंड्याच्या इन्स्टाग्राम पेजवर ३.७ मिलियन्सहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती नियमितपणे तिच्या चाहत्यांसाठी व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. 

मात्र, आता काही नेटकरी तिला हार्दिक पंड्याच्या कारणावरून शिविगाळ करून त्रास देत आहेत. नतासाच्या पोस्टवर चाहते द्वेषपूर्ण आणि अपमानजनक कमेंट्स करत आहेत.

Online trolls are targeting Natasa Stankovic over her husband, Hardik Pandya's poor performance in IPL 2024.
Online trolls are targeting Natasa Stankovic over her husband, Hardik Pandya's poor performance in IPL 2024. (Instagram/@natasastankovic__)

दरम्यान, मैदानावरील खराब कामगिरीमुळे क्रिकेटपटूंच्या पत्नी किंवा गर्लफ्रेंड्सना दोष देणे हा काही नवा ट्रेंड नाही. आता हे नताशा स्टॅनकोविचसोबत घडत आहे. हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविचला अनेकांनी ट्रोल केले आहे, तर अनेकजण तिच्या बचावातही उतरले आहेत.

अफगाणिस्तानच्या १६ वर्षीय फिरकीपटूची IPL मध्ये एन्ट्री, केकेआरकडून खेळणार

दरम्यान, ३० वर्षीय हार्दिकच्या कर्णधारपदाला सध्या कोणताही धोका नाही कारण मुंबई इंडियन्सचे मालक घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ इच्छित नाहीत. मुंबई संघाने स्पर्धेत निराशाजनक सुरुवात केली आहे. पण ते लवकरच विजयी मार्गावर परततील अशी मुंबईच्या चाहत्यांना अपेक्षा आहे.