इंडियम प्रीमियर लीग २०२५ ची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या शनिवारी (२८ सप्टेंबर) झालेल्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. अनकॅप्ड खेळाडू, आरटीएम, खेळाडू रिटेन करणे, मॅच फी आणि फ्रँचायझी पर्स यासारखे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
आता आयपीएलता १८वा हंगाम मार्च २०२५ च्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिल २०२५ च्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल. पण मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आयपीएल २०२५ चा पहिला सामना खेळू शकणार नाही हे आधीच निश्चित झाले आहे.
वास्तविक, IPL २०२४ च्या शेवटच्या सामन्यात हार्दिक पांड्याने मोठी चूक केली होती. त्याचा संघ मुंबई इंडियन्सला निर्धारित वेळेत २० षटकेही पूर्ण करता आली नव्हती. गेल्या मोसमात हार्दिकने तिसऱ्यांदा ही चूक केली होती.
अशा परिस्थितीत सामना संपल्यानंतर हार्दिक पांड्यावर ३० लाखांचा दंड आणि १ सामन्याची बंदी घालण्यात आली. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना लखनौ सुपर जायंट्सशी झाला होता.
१७ व्या हंगामातील मुंबई इंडियन्सचा हा शेवटचा सामना होता, त्यामुळे हार्दिक पांड्या आयपीएल २०२५ चा पहिला सामना खेळू शकणार नाही.
हार्दिक पांड्यापूर्वी ऋषभ पंतवरही आयपीएल २०२४ मध्ये स्लो ओव्हर रेटमुळे एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती.
IPL २०२४ सुरू होण्यापूर्वी हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवण्यात आले होते. त्याने रोहित शर्माची जागा घेतली होती. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्सकडून खरेदी केले. मात्र, फ्रँचायझीचा हा निर्णय चाहत्यांना आवडला नाही.
सोशल मीडियापासून मैदानापर्यंत चाहत्यांनी हार्दिकला ट्रोल केले. हार्दिक पांड्याला सामन्यादरम्यान आणि मैदानाबाहेर चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सची कामगिरी फारच खराब होती. संघाने १७ व्या सत्रात १४ सामने खेळले आणि केवळ ४ जिंकले. हा संघ ८ गुणांसह गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर होता.
संबंधित बातम्या