Natasa Stankovic With Another Guy : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांनी जोर पकडला आहे. पण आता या बातम्यांदरम्यान एका नव्या व्यक्तीची या प्रकरणात एन्ट्री झाली आहे, ज्याला पाहून लोक सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत.
खरं तर हार्दिक आणि नताशाच्या घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान हार्दिकची पत्नी नताशा एका नव्या पुरुषासोबत दिसली आहे. नताशा आणि त्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांना प्रश्न पडत आहेत की नताशाने या व्यक्तीसाठी हार्दिक पांड्याला फसवले का? मात्र हार्दिक आणि नताशाच्या घटस्फोटाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. हार्दिक किंवा नताशा या दोघांनीही कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही.
नताशाचा नव्या माणसासोबतचा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने व्हिडिओ शेअर करत प्रश्न विचारला की, यामुळेच नताशाने हार्दिकची फसवणूक केली आहे का?
याशिवाय इतरही अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया या व्हिडिओवर समोर आल्या आहेत.
व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती नताशाचा जुना मित्र असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचे नाव ॲलेक्स आहे. रिपोर्ट्समध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, ॲलेक्स हा नताशा स्टॅनकोविच आणि अभिनेत्री दिशा पटानी यांचा बऱ्याच काळापासून कॉमन फ्रेंड आहे.
दरम्यान, नताशा या व्हिडीओमध्ये खूपच रिलॅक्स दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर कसलीही अस्वस्थता दिसत नव्हती.
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांची भेट सुमारे ७ वर्षांपूर्वी झाली होती. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ३१ मे २०२० रोजी त्यांनी कोर्ट मॅरेज केले. जुलै २०२० मध्ये त्यांना एक मुलगा झाला. त्याचे नाव अगस्त्य आहे.
संबंधित बातम्या