टीम इंडियाच्या कर्णधारपदासाठी हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादवमध्ये चुरस, कोणाचं पारडं जड? वाचा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  टीम इंडियाच्या कर्णधारपदासाठी हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादवमध्ये चुरस, कोणाचं पारडं जड? वाचा

टीम इंडियाच्या कर्णधारपदासाठी हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादवमध्ये चुरस, कोणाचं पारडं जड? वाचा

Updated Jul 18, 2024 06:22 PM IST

Hardik Pandya vs Suryakumar Yadav: रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव हे भारतीय टी-२० संघाच्या कर्णधारपदासाठी प्रमुख दावेदार आहेत.

हार्दिक पांड्या की सूर्यकुमार यादव, भारताच्या टी-२० संघाचा नवा कर्णधार कोण?
हार्दिक पांड्या की सूर्यकुमार यादव, भारताच्या टी-२० संघाचा नवा कर्णधार कोण? (PTI)

Team India T20I Captain: २०२४ च्या टी-२० विश्वचषकात विजेतेपद पटकावणाऱ्या रोहित शर्माने  टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने भारताचा पुढचा कर्णधार कोण असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले. भारताच्या टी-२० संघाच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव आघाडीवर आहेत. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी अष्टपैलू हार्दिक पांड्याऐवजी सूर्यकुमार यादवला टी-२० संघाचा कर्णधार म्हणून पसंती दिल्याची चर्चा सुरू आहे.

गेल्या वर्षी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती. त्यानंतर सूर्यकुमारला टी-२० संघाचा कर्णधार बनवण्यात आले. मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून पहिल्या मोसमात खडतर कामगिरी करूनही पांड्याला टी-२० विश्वचषकात उपकर्णधार बनवण्यात आले. यामुळे रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर हार्दिक पांड्या भारतीय संघाचे नेतृत्व करेल, हे जवळपास निश्चित आहे. परंतु, याबाबत अद्यात कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही.

मात्र, टी-२० विश्वचषक संपल्यानंतर राहुल द्रविडचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळही संपुष्टात आला. बीसीसीआयने काही दिवसांनी गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षक म्हणून घोषणा केली. गौतम गंभीरने सूर्यकुमारला टी-२० संघाचा कर्णधार म्हणून पसंती दिल्याने भारताचे नेतृत्व कोणी करणार, यावरून अनेक चर्चांना उधाण आले. भारतीय निवड समिती श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करेल. यानंतरच सर्व चर्चांना पूर्णविराम लागेल.  या दोन स्टार खेळाडूंनी टी-२० मध्ये कर्णधार म्हणून कशी कामगिरी केली ते पाहुयात.

हार्दिक पांड्या

हार्दिकपांड्याने २६ जून २०२२ ते १३ ऑगस्ट २०२३ दरम्यान १६ टी-२० सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. त्यापैकी १० सामने त्याने जिंकले आहेत. तर, पाच सामने गमावले आहेत. नेपियरयेथे न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या टी-२० सामन्यातही तो कर्णधार होता. पावसामुळे खेळाडूंना माघारी परतावे लागण्याआधीच भारताने डीएलएसच्या बरोबरीच्या धावसंख्येपर्यंत मजल मारली होती. यापुढे कोणताही खेळ होऊ शकला नाही, याचा अर्थ सामना टायब्रेकर न खेळता सामना बरोबरीत घोषित करण्यात आला. कसोटी खेळणाऱ्या दोन देशांमधील हा तिसरा आणि पहिला टी-२० सामना होता.

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने २३ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२३ दरम्यान पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरगुती टी-२० मालिका खेळली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेत झालेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत त्याने भारताचे नेतृत्व केले. सूर्यकुमारने आतापर्यंत दोन मालिकांमध्ये सात टी-२० सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली भारताने ८ टी-२० सामन्यात पाच विजय मिळवले आहेत. तर, एक सामना अनिर्णित ठरला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या