Hardik Pandya News: क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि त्याची मॉडेल पत्नी नताशा स्तांकोविक अजूनही एकत्र आहेत का? असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला आहे. आयपीएल २०२४ दरम्यान हार्दिकने नताशाच्या वाढदिवशी काहीही पोस्ट न केल्याने घटस्फोटाची अफवा पसरली होती. याचदरम्यान नताशाने लग्नाचे फोटो डिलीट केल्याची बातमीही समोर आली होती. हार्दिक आणि भारतीय क्रिकेट संघाने २०२४ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक जिंकला आणि नताशा वगळता देशातील सर्वांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. त्याचवेळी हार्दिकचा एका मिस्ट्री गर्लसोबतचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. या फोटोवर चाहते 'नवीन वहिनी भेटली' अशी प्रतिक्रिया देत आहेत.
ही मिस्ट्री गर्ल खरंतर डिजिटल क्रिएटर आणि मेकअप आर्टिस्ट प्राची सोलंकी आहे, तिने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर क्रिकेटपटूसोबतच्या भेटीची क्लिप शेअर केली आहे. नंतर पॅपराझी आणि फॅन पेजने हे सोशल मीडियावर पुन्हा शेअर केले. दरम्यान, या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, "जेव्हा मी विश्वचषकातील नायकाला भेटले." व्हिडिओत दोघेही पोल्का-डॉट आउटफिटमध्ये झळकत आहेत.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. एका सोशल मीडिया युजरने लिहिले की, ‘हमारी तरफ से हा है, नई भाभी के लिए पांड्या भाई. “ तर, दुसऱ्या युजरने अशी कमेंट केली आहे की, “भाभी २ लोडिंग.” एका इंटरनेट युजरने लिहिले की, ‘गायज न्यू भाभी मिल गई’. एका चाहत्याने लिहिले की, 'कदाचित ती नताशाची पोकळी भरून काढेल आणि हार्दिक तिच्या प्रेमात पडेल. आणखी एका चाहत्याने लिहिले की, "प्लीज लग्न करा.”
बार्बाडोसयेथे २९ जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या हार्दिक पांड्याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली. आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केलेल्या या शॉर्ट क्लिपमध्ये गेल्या काही महिन्यांत त्याला कोणत्या अडचणींना सामोरे जावा लागले, यावर त्याने प्रकाश टाकला. भारताला दुसरा टी-२० विश्वचषक जिंकून ११ वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्यास कशी मदत केली, यावरही त्यााने भाष्य केले. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान त्याच्या पायाच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. यामुळे त्याला स्पर्धेतून बाहेर पडावा लागले होते. पण, अखेर टी-२० विश्वचषक स्पर्धेत त्याने अष्टपैलू चमक दाखवत पुनरागमन केले.
संबंधित बातम्या