Viral Video : हार्दिक हे वागणं बरं नव्हं... हा व्हिडीओ पाहून रोहितच्या चाहत्यांचं काळीज तीळ-तीळ तुटेल-hardik pandya treating badly with rohit sharma in gt vs mi match video goes viral on social media ipl 2024 ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Viral Video : हार्दिक हे वागणं बरं नव्हं... हा व्हिडीओ पाहून रोहितच्या चाहत्यांचं काळीज तीळ-तीळ तुटेल

Viral Video : हार्दिक हे वागणं बरं नव्हं... हा व्हिडीओ पाहून रोहितच्या चाहत्यांचं काळीज तीळ-तीळ तुटेल

Mar 25, 2024 11:25 AM IST

Hardik Pandya Rohit Sharma Video : मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार हार्दिक पांड्या जेव्हा टॉससाठी मैदानात आला तेव्हा मैदानातील चाहत्यांनी त्याला चांगलेच ट्रोल केले. हार्दिकला रोहित शर्माच्या जागी कर्णधार बनवण्यात आले, तेव्हापासून तो चाहत्यांच्या टार्गेटवर आहे.

Hardik Pandya Rohit Sharma Video हार्दिक हे वागणं बरं नव्हं... हा व्हिडीओ पाहून रोहितच्या चाहत्यांच काळीज तीळ-तीळ तुटेल
Hardik Pandya Rohit Sharma Video हार्दिक हे वागणं बरं नव्हं... हा व्हिडीओ पाहून रोहितच्या चाहत्यांच काळीज तीळ-तीळ तुटेल

GT vs MI Indian Premier League 2024 : आयपीएल २०२४ चा पाचवा सामना (२४ मार्च) मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबई इंडिन्सला पराभवाचे तोंड पाहावे लागले. मुंबईने शेवटच्या षटकात ६ धावांनी हा सामना गमावला.

या सामन्यात मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर गुजरातने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १६८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईला ९ बाद १६२ धावाच करता आल्या.

तत्पूर्वी, मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार हार्दिक पांड्या जेव्हा टॉससाठी मैदानात आला तेव्हा मैदानातील चाहत्यांनी त्याला चांगलेच ट्रोल केले. हार्दिकला रोहित शर्माच्या जागी कर्णधार बनवण्यात आले, तेव्हापासून तो चाहत्यांच्या टार्गेटवर आहे. हार्दिक गोलंदाजीला आला तेव्हादेखील चाहत्यांनी रोहित-रोहित अशा घोषणा द्यायला सुरुवात केली.

या दरम्यानच, आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील प्रसंग पाहून रोहितच्या चाहत्यांचे काळीज तुटणार आहे.

व्हिडीओत नेमकं काय?

वास्तविक, या व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्या गोलंदाज गेराल्ड कोएत्झीसोबत क्षेत्ररक्षण लावताना दिसत आहे. या दरम्यान तो रोहितलाही एका जागेवरून दुसऱ्या जागी फिल्डींगला जाण्याचा आदेश देताना दिसत आहे. हार्दिकने सांगितल्यानंतर रोहित लगेच सीमारेषेकडे धावताना दिसत आहे. यानंतर, हार्दिक पुन्हा रोहितला फिल्डींगची जागा बदलण्याचा इशारा करताना दिसत आहे. आता हार्दिकचे रोहितसोबतचे हेच वागणे चाहत्यांना अजिबात आवडले नाही.

रोहितने शानदार खेळी केली

आयपीएल २०२४ रोहित शर्मा आता केवळ एक फलंदाज म्हणून खेळत आहे. पण त्याने पहिल्याच सामन्यात फलंदाजीने खळबळ उडवून दिली. रोहितने तुफानी शैलीत फलंदाजी करताना २९ चेंडूत ४३ धावांची जलद खेळी केली. रोहितने आपल्या खेळीत ७ चौकार आणि १ गगनचुंबी षटकार लगावला.

शेवटच्या षटकात मुंबईचा पराभवच

IPL २०२४ च्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाला सामोरे जावे लागले. गुजरातने दिलेल्या १६९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचा संघ ९ गडी गमावून १६२ धावाच करू शकला. अखेरच्या षटकात संघाला १९ धावांची गरज होती. हार्दिकने पहिल्या दोन चेंडूंवर १० धावा केल्या, पण उमेश यादवने पुढच्या दोन चेंडूंवर २ बळी घेत गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.