Viral Video : हार्दिक पंड्या अजूनही विसरला नाही ते दिवस! सिलेक्टरच्या समोर जोडले हात, तुम्हीही कराल कौतुक
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Viral Video : हार्दिक पंड्या अजूनही विसरला नाही ते दिवस! सिलेक्टरच्या समोर जोडले हात, तुम्हीही कराल कौतुक

Viral Video : हार्दिक पंड्या अजूनही विसरला नाही ते दिवस! सिलेक्टरच्या समोर जोडले हात, तुम्हीही कराल कौतुक

Dec 02, 2024 06:07 PM IST

Hardik Pandya Viral Video : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात तो सिलेक्टरसमोर हात जोडताना दिसत आहे.

हार्दिक पांड्या
हार्दिक पांड्या (PTI)

Viral Video : संघर्षाच्या दिवसात आपल्याला साथ देणाऱ्यांबद्दल नेहमी कृतज्ञ राहिलं पाहिजे. मदत देणाऱ्या या हातांची कायम आठवण ठेवली पाहिजे. भारताचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्यादेखील हे तत्व कायम पाळतो. त्याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे.

हार्दिकचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात तो आपल्या बालपणीच्या काळातील निवडकर्त्याचे आभार मानताना दिसत आहे. ३१ वर्षीय खेळाडूनं व्हिडिओ कॉलवर निवडकर्त्याशी संवाद साधला आणि ४०० रुपये मॅच फी भरल्याबद्दल त्याचे आभार मानले. हे ४०० रुपये त्यावेळी हार्दिकसाठी खूपच मोलाचे ठरले होते.

व्हिडिओमध्ये हार्दिक टेनिस बॉल क्रिकेटमधील निवडकर्त्याशी गुजराती भाषेत बोलताना दिसत आहे. निवड समितीचे एक सदस्य म्हणतात की, 'हार्दिक, देवाचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. हे ऐकून हार्दिक हात जोडून त्यांचे आभार मानतो. 'तुम्ही दिलेले ४०० रुपये माझ्यासाठी खूपच उपयुक्त होते, असं तो कृतज्ञता व्यक्त करताना म्हणतो.

टेनिस क्रिकेटपासून केली सुरुवात

हार्दिक पंड्याचा जन्म गुजरातमधील चोरयासी इथं झाला. हार्दिक आज नामवंत खेळाडू असला तरी त्याचा सुरुवातीचा काळ खूप संघर्षाचा होता. अनेकदा गुजरातच्या दुर्गम गावांमध्ये स्थानिक आणि टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी जात असे. या सामन्यांमध्ये त्याला अनेकदा ४००-५०० रुपये मॅच फी मिळत असे. सुरुवातीच्या काळात ती सुद्धा खूप महत्त्वाची होती. 

कठीण परिस्थितीला तोंड देत त्यानं क्रिकेटच्या मैदानात आपला ठसा उमटवला आहे. त्यानं २०१५ मध्ये मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं आणि कधीही मागे वळून पाहिलं नाही. तो आता मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे. सध्या तो टी-२० आंतरराष्ट्रीय अष्टपैलू खेळाडू आहे. त्यानं २०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.

हार्दिकच्या नावावर किती आंतरराष्ट्रीय सामने?

हार्दिक सध्या देशांतर्गत टी-२० स्पर्धा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२४ मध्ये बडोद्याकडून खेळत आहे. त्यानं आतापर्यंत इथं जबरदस्त छाप पाडली आहे. त्यानं चार सामन्यांत नाबाद दोन अर्धशतकांसह तीन अर्धशतकं झळकावली आहेत. एका सामन्यात ४७ धावा करून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेतून दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर झालेल्या टी-२० मालिकेत त्यानं चमकदार कामगिरी केली. हार्दिकनं ११ कसोटी, ८६ वनडे आणि १०९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग