Baroda vs Tamil Nadu : आयपीएल सुरू होण्याआधीच हार्दिक पंड्यानं CSK च्या गोलंदाजाला धुतलं, सलग ४ षटकार ठोकले
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Baroda vs Tamil Nadu : आयपीएल सुरू होण्याआधीच हार्दिक पंड्यानं CSK च्या गोलंदाजाला धुतलं, सलग ४ षटकार ठोकले

Baroda vs Tamil Nadu : आयपीएल सुरू होण्याआधीच हार्दिक पंड्यानं CSK च्या गोलंदाजाला धुतलं, सलग ४ षटकार ठोकले

Nov 27, 2024 09:54 PM IST

Hardik Pandya, Baroda vs Tamil Nadu : हार्दिक पांड्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केले. त्याने ३० चेंडूत ६९धावा केल्या. यादरम्यान हार्दिक पंड्याने एकाच षटकात ३० ठोकल्या.

Baroda vs Tamil Nadu : आयपीएल सुरू होण्याआधीच हार्दिक पंड्यानं CSK च्या गोलंदाजाला धुतलं, सलग ४ षटकार ठोकले
Baroda vs Tamil Nadu : आयपीएल सुरू होण्याआधीच हार्दिक पंड्यानं CSK च्या गोलंदाजाला धुतलं, सलग ४ षटकार ठोकले (X)

Hardik Pandya, Baroda vs Tamil Nadu : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२४ मध्ये धुमाकूळ घातला आहे. हार्दिक पांड्याने बडोद्याकडून खेळताना एकाच षटकात २९ धावा करण्याचा पराक्रम केला आहे. 

खरं तर, आज (२७ नोव्हेंबर) इंदूरच्या होळकर स्टेडियमवर बडोदा आणि तामिळनाडू यांच्यात एक रोमांचक सामना झाला, ज्यामध्ये बडोदाने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून विजय मिळवला. याच सामन्यात हार्दिकने २० चेंडूत अर्धशतक ठोकले. पण तो धावबाद झाल्याने सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला.

गुर्जपनीतच्या षटकात ठोकल्या २९ धावा

या सामन्यात शाहरुख खानच्या नेतृत्वाखालील तामिळनाडूने प्रथम फलंदीज २२१ धावा ठोकल्या होत्या. प्रत्युत्तरात बडोद्याची धावसंख्या १६व्या षटकात ६ गडी गमावून १५६ धावांपर्यंत पोहोचली होती.

या दरम्यान, गुर्जपनीत हा १७ व्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आला, ज्याच्या षटकात हार्दिकने ४ षटकार आणि एक चौकारासह एकूण २९ धावा केल्या. बडोद्याला विजयासाठी शेवटच्या ४ षटकांत ६६ धावा करायच्या होत्या, तर १७व्या षटकात हार्दिक पंड्याच्या झंझावातानंतर त्याच्या संघाला १८ चेंडूत ३६ धावा करायच्या होत्या.

१६व्या षटकाच्या अखेरीस हार्दिक पांड्याने १० चेंडूत १५ धावा केल्या होत्या. त्याने गुर्जपनीतच्या पहिल्या ३ चेंडूंवर षटकारांची हॅट्ट्रिक केली. चौथा चेंडू गुर्जपनीतने नो-बॉल टाकला, यानंतर हार्दिकने चौथ्या लीगल चेंडूवर पुन्हा षटकार ठोकला. हार्दिकने या षटकात पाचव्या चेंडूवर एक चौकार आणि शेवटच्या चेंडूवर एक चौकार घेत एकूण २९ धावा केल्या. षटकात नो बॉलसह ३० धावा.

गुरजपनीत सिंगला CSK ने खरेदी केले

गुर्जपनीत डाव्या हाताने वेगवान गोलंदाजी करतो आणि आयपीएल २०२५ मेगा लिलावादरम्यान प्रसिद्धीच्या झोतात आला. त्याला चेन्नई सुपर किंग्सने २.२० कोटी रुपयांना विकत घेतले आहे. गुर्जपनीतने आपल्या T20 कारकिर्दीत फक्त दोन सामने खेळले आहेत, ज्यात त्याने फक्त २ विकेट घेतल्या आहेत. त्याची उंची ६ फूट ३ इंच असून तो डाव्या हाताने गोलंदाजी करतो.

Whats_app_banner