भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या सध्या सुट्टीवर आहे. तो शेवटचा श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिकेत खेळला होता. त्याने एकदिवसीय मालिकेतून आपले नाव मागे घेतले होते. पत्नी नताशा स्टॅनकोविचपासून विभक्त झाल्यानंतर पंड्या वैयक्तिक आयुष्यात अडचणींचा सामना करत होता.
हार्दिक पंड्या सध्या परदेश दौऱ्यावर आहे. येथे तो सुट्ट्या एन्जॉय करत आहे. पण तो कोणासोबत फिरतोय याची माहिती कोणालाच नाही. पंड्याने सोशल मीडियावर लेटेस्ट फोटो शेअर केला आहे.
पंड्याने इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तो ट्रेनमध्ये बसलेला दिसत आहे. पंड्या बाहेर फिरायला गेला आहे. मात्र तो कोणासोबत फिरत होता, याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.
पंड्याचे फोटो दुसऱ्याने क्लिक केले आहेत. अलीकडेच पांड्याचे नाव ब्रिटीश गायिका जास्मिन वालियासोबत जोडले जात होते. पांड्या सध्या जास्मिनला डेट करत असल्याची चर्चा होती. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
हार्दिक आणि नताशा का वेगळे झाले याविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एका वृत्तपत्रातील बातमीनुसार, पांड्याला ग्लॅमरस लाइफ आवडते. तर नताशाला खूप शांत आणि साधे राहायला आवडते. नताशाने पंड्यासोबत राहण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. पण तिला या या परिस्थितीशी जुळवून घेता आले नाही.
मुंबई इंडियन्सने IPL २०२४ मध्ये हार्दिक पंड्याला संघाचा कर्णधार बनवले होते. मात्र रोहित शर्माला याबाबत आधी माहिती देण्यात आली नव्हती. रोहित आणि त्याच्या चाहत्यांना हे आवडले नाही. यामुळे पंड्या खूप ट्रोल झाला होता. आता आयपीएल २०२५ पूर्वीही अशीच काहीशी परिस्थिती आहे. पंड्याला मुंबईच्या कर्णधारपदावरून हटवले जाऊ शकते. तसे न झाल्यास रोहित संघ सोडू शकतो. मात्र याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.