कपिल देव यांनी १९९४ मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तेव्हापासून, भारताला वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडूची गरज होती. कपिल देव यांच्यानंतर अजित आगरकर, इरफान पठाण, विजय शंकर ते आता शिवम दुबे अशी अनेक नावं आली. पण हे खेळाडू दोन्ही विभागात म्हणजेच फलंदाजी आणि गोलंदाजीत टॉपर नव्हते. मात्र, हार्दिक पंड्याने कपिल देव यांची उणीव भरून काढली.
हार्दिक पांड्याने २०१६ मध्ये टीम इंडियासाठी पदार्पण केले. हार्दिककडे बॅट आणि बॉल दोन्हीने सामने जिंकवण्याची क्षमता आहे. २०२४ च्या T20 वर्ल्ड कपमध्ये हार्दिकने हे पुन्हा एकदा सिद्ध केले.
T20 विश्वचषक २२०४ मध्ये भारताच्या विजयानंतर हार्दिक पांड्याने स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हार्दिक म्हणत आहे की, बडोदा आणि भारतासाठी खेळणे हे आमचे स्वप्न आहे. हार्दिकने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'बडोद्यातील एक मुलगा जो त्याचे स्वप्न जगत आहे आणि जे काही त्याच्या मार्गात आले त्याबद्दल कृतज्ञ आहे. यापेक्षा जास्त काही मागता येणार नाही. आपल्या देशासाठी खेळणे हा नेहमीच सर्वात मोठा सन्मान आहे".
हार्दिक पांड्याने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर T20 विश्वचषकाच्या अंतिम सामना फिरवला. आफ्रिकेला २४ चेंडूत केवळ २७ धावा करायच्या होत्या. तर भारतीय गोलंजदाजांना या धावांचा बचाव करायचा होता . हार्दिकने २२ चेंडूत अर्धशतक ठोकणाऱ्या हेनरिक क्लासेनला बाद केले. टीम इंडियाचं पुनरागमन इथूनच झालं. यानंतर भारतीय संघाच्या उपकर्णधारासमोर अखेरच्या षटकात १६ धावांच्या बचावाचे लक्ष्य होते. त्याने ८ धावांत २ विकेट घेत भारताला विश्वविजेते बनवले.
हार्दिक पांड्या हा भारतीय क्रिकेट संघातील सर्वात खास खेळाडूंपैकी एक आहे. त्याच्याकडे असलेले कौशल्य भारतातील काही मोजक्याच खेळाडूंकडे आहे. यानंतर सर्वाधिक ट्रोल होणाऱ्या क्रिकेटपटूंमध्येदेखील हार्दिकचा समावेश आहे. २०१५ मध्ये हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सने विकत घेतले होते, तो आज या संघाचा कर्णधार आहे. पहिल्याच आयपीएल सीझनमध्ये छाप पाडल्यानंतर त्याला २०१६ मध्ये भारताकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली. आता हार्दिक टी-20 विश्वचषक विजेता ठरला आहे.