मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Hardik Pandya : वर्ल्डकपमध्ये दुखापत, आता आयपीएलपूर्वी फिट... हार्दिक पांड्या मैदानावर परतला

Hardik Pandya : वर्ल्डकपमध्ये दुखापत, आता आयपीएलपूर्वी फिट... हार्दिक पांड्या मैदानावर परतला

Jan 29, 2024 04:40 PM IST

Hardik Pandya : हार्दिकच्या घोट्याला दुखापत झाली होती. यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि तो एनसीएमध्ये फिनेसवर मेहनत घेत होता.

hardik pandya practice
hardik pandya practice

आगामी टी-20 वर्ल्डकप वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणार आहे. या स्पर्धेत २० संघ सहभागी होणार आहेत. यजमान म्हणून अमेरिका आणि वेस्ट इंडिज आधीच पात्र ठरले आहेत. पण आता टी-20 वर्ल्डकपआधी टीम इंडियाच्या दृष्टीने मोठी बातमी समोर आली आहे.

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या मैदानावर परतला आहे. हार्दिक वनडे वर्ल्डकप २०२३ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता.

हार्दिकच्या घोट्याला दुखापत झाली होती. यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि तो एनसीएमध्ये फिनेसवर मेहनत घेत होता. यामुळे निवडकर्त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी त्याची निवड झाली नाही.

ट्रेंडिंग न्यूज

मात्र, आता तंदुरुस्त झाल्यानंतर तो मैदानात परतला असून गोलंदाजीचा सराव करताना दिसत आहे.

मैदान माझ्यासाठी मंदिरासारखे

हार्दिक पांड्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, यामध्ये तो म्हणतोय, की येथे परत आल्याने खूप छान वाटत आहे. मैदान माझ्यासाठी मंदिरासारखे आहे. मी १७ वर्षांपूर्वी येथून सर्वकाही सुरू केले. सरावासाठी मी जितका वेळ देऊ शकतो तितका वेळ देतो. व्हिडिओमध्ये हार्दिक धावताना आणि व्यायाम करताना दिसत आहे.

हार्दिक पांड्याने भारतासाठी तिन्ही फॉरमॅट खेळले

हार्दिक पांड्याची गणना सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये केली जाते. त्याने टीम इंडियासाठी अनेकदा चांगली कामगिरी केली आहे. उत्कृष्ट गोलंदाजीसोबतच तो खालच्या फळीत फलंदाजी करण्यातही माहीर आहे.

अलीकडेच मुंबई इंडियन्स संघाने त्याला रोहित शर्माच्या जागी कर्णधार बनवले आहे. हार्दिकने भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळले आहे. टीम इंडियासाठी त्याने ११ कसोटी सामन्यात ५२३ धावा, ८६ एकदिवसीय सामन्यात १७६९ धावा आणि ९२ टी 20 सामन्यात १३४८ धावा केल्या आहेत.

WhatsApp channel