Hardik Pandya Natasa Stankovic Divorce: टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री मॉडेल असलेली त्याची पत्नी नताशा स्टँकोविच यांचा अखेर घटस्फोट झाला आहे. दोघांच्या घटस्फोटाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होत्या, अखेर आज हार्दिक आणि नताश दोघांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून घटस्फोटाची घोषणा करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. दोघांनी चार वर्षांच्या संसारानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
आमचा ४ वर्षांचा संसार होता. आम्ही या काळात अनेक चांगले क्षण जगलो. आम्ही जरी वेगळे होत असलो तरीही आमचा मुलगा अगस्त्य याला आम्ही आई-वडीलांचे प्रेम कमी पडू देणार नाही. आम्ही दोघेही त्याची काळजी घेऊ, अशी पोस्ट लिहीत दोघांनीही लिहिली आहे.
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविच यांनी विभक्त होण्याच्या वृत्ताला सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून दुजोरा दिला आहे. या जोडप्याने इन्स्टाग्रामवर एक संयुक्त निवेदन जारी करत परस्पर विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. नताशाने मुलगा अगस्त्यसोबत मुंबई सोडल्याच्या वृत्तानंतर आणि त्यांच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या कयासांच्या चर्चेनंतर ही घोषणा करण्यात आली आहे.
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविच यांनी सांगितले की, ते आपल्या तीन वर्षांच्या मुलाचे सहपालक म्हणून काम करत राहतील.
चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर मी आणि नताशा ने एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे,' असे या क्रिकेटपटूने गुरुवारी संध्याकाळी शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे. "आम्ही एकत्र सर्वतोपरी प्रयत्न केले आणि आमचे सर्वस्व पणाला लावले आणि आम्हाला विश्वास आहे की हे आमच्या दोघांच्याहिताचे आहे.
आम्ही एकत्र उपभोगलेला आनंद, परस्पर आदर आणि सहवास पाहता आणि आम्ही एक कुटुंब वाढवत असताना आमच्यासाठी हा निर्णय घेणे कठीण होते, असे निवेदनात म्हटले आहे.
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविच यांनी २०२० मध्ये लग्न केले आणि त्याच वर्षी त्यांनी आपला मुलगा अगस्त्याचे स्वागत केले. "आम्हाला अगस्त्य लाभला आहे, जो आमच्या दोघांच्याही आयुष्याच्या केंद्रस्थानी राहील आणि आम्ही त्याच्या आनंदासाठी शक्य ते सर्व काही देऊ याची खात्री करण्यासाठी आम्ही सहपालक होऊ," असे या जोडप्याने सांगितले.
त्यांच्या वक्तव्याचा शेवट गोपनीयतेच्या विनंतीने झाला. या कठीण आणि संवेदनशील काळात आमच्या गोपनीयतेसाठी आम्ही तुमच्या पाठिंब्याची आणि समजूतदारपणाची मनापासून विनंती करतो.
या जोडप्याच्या घटस्फोटाच्या अफवा अनेक महिन्यांपासून पसरत होत्या. यावर्षी मार्चमध्ये नताशाने तिच्या इन्स्टाग्रामवरून 'पांड्या' आडनाव काढून टाकले आणि त्यांचे सर्व फोटो डिलीट केले होते.
सर्बियन मॉडेल आणि अभिनेत्री आयपीएल २०२४ आणि टी २० विश्वचषकादरम्यान देखील चिअर करताना दिसली नाही.
अलीकडेच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसमारंभात हार्दिक पांड्या एकटाच उपस्थित राहिल्यानंतर त्यांच्या विभक्त होण्याच्या चर्चांना वेग आला होता. काही तासांपूर्वी नताशाने एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली होती, ज्यात हिरव्या रंगाचा रहिवासी रस्ता आणि "होम स्वीट होम" असे लिहिले होते, ज्यामुळे ती सर्बियातील तिच्या मूळ गावी परतल्याच्या चर्चांना उधाण आले होते.
संबंधित बातम्या