Hardik- Natasa Divorce: हार्दिक- नताशा यांचा घटस्फोट, मुलगा अगस्त्यचा ताबा कोणाकडे? पांड्यानं दिलं असं उत्तर!
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Hardik- Natasa Divorce: हार्दिक- नताशा यांचा घटस्फोट, मुलगा अगस्त्यचा ताबा कोणाकडे? पांड्यानं दिलं असं उत्तर!

Hardik- Natasa Divorce: हार्दिक- नताशा यांचा घटस्फोट, मुलगा अगस्त्यचा ताबा कोणाकडे? पांड्यानं दिलं असं उत्तर!

Jul 19, 2024 11:17 PM IST

Hardik Pandya on Son Agastya: हार्दिक पांड्या आणि नताशा स्तांकोविक यांच्या घटस्फोटानंतर त्यांचा मुलगा अगस्त्यचा ताबा कोणाकडे असेल? या प्रश्नावर हार्दिक पांड्याने काय उत्तर दिले? हे जाणून घेऊयात.

हार्दिक पांड्या- नताशा स्तांकोविक यांचा घटस्फोट
हार्दिक पांड्या- नताशा स्तांकोविक यांचा घटस्फोट

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce: हार्दिक पांड्या आणि नताशा स्तांकोविक यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होत्या. मध्यंतरी नताशाने त्यांच्या लग्नाचे फोटो डिलीट केल्यापासूनच दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी आणखी जोर धरला. मात्र, याबाबत दोघांकडूनही अधिकृत घोषणा झाली नव्हती. अखेर हार्दिक पांड्याने गुरुवारी संध्याकाळी पत्नी नताशापासून विभक्त झाल्याची सोशल मीडियावर पोस्ट केली. आम्ही ४ वर्ष सोबत राहिल्यानंतर एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला, असे हार्दिकने म्हटले आहे. परंतु, हार्दिक आणि नताशा यांच्या घटस्फोटानंतर त्यांचा मुलगा अगस्त्याचा ताबा कोणाकडे असेल? हे देखील पांड्याने स्पष्ट केले.

हार्दिक पांड्याने आपल्या पोस्टमध्ये अगस्त्यचा उल्लेख करत म्हणाला की, "अगस्त्यमुळे आमच्या आयुष्यात भरभराट आली. आम्ही त्याला जगातील सर्व सुख देण्याचा प्रयत्न करू. तो आमच्या जीवनाचा आधार असेल. आम्ही दोघे मिळून त्याची काळजी घेऊ." महत्त्वाचे म्हणजे,अगस्त्य सध्य ४ वर्षाचा आहे, त्याचा जन्म ३० जुलै २०२१ रोजी झाला. नताशा नुकतीच अगस्त्यासोबत सर्बियाला गेली आहे. घरी पोहोचल्यानंतरच तिने हार्दिक पांड्यापासून विभक्त झाल्याची घोषणा केली.

कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अगस्त्य लहान आहे, त्यामुळे तो सध्या त्याच्या आईकडेच राहणार आहे. हार्दिक पांड्या परस्पर संमतीने किंवा न्यायालयाच्या परवानगीने त्याला भेटू शकतो. शिखर धवन आणि त्याची पत्नी आयशा मुखर्जी यांचाही घटस्फोट झाला आहे. अशा परिस्थितीत त्यांचा मुलगा जोरावर सध्या आईसोबत आहे. धवन अनेकदा त्याच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलताना दिसला आहे.

नताशा स्तांकोविक ही सर्बियाची मॉडेल आहे. तिचा जन्म ४ मार्च १९९२ रोजी झाला. ती २०१२ मध्ये मुंबईत आली होती, जिथे त्याने काही जाहिरातींमध्ये काम करायला सुरुवात केली. काही वेळातच ती प्रसिद्ध मॉडेल बनली. सत्याग्रह या चित्रपटात ती झळकली. त्यानंतर तिने ॲक्शन-जॅक्सन, फुक्रे रिटर्न्स, फ्रायडे, डॅडी, झिरो यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले. झलक दिखला जा आणि बिग बॉस सारख्या शोमध्येही तिची उपस्थिती पाहायला मिळाली.मिळालेल्या माहितीनुसार, नताशा एका नाईट क्लबमध्ये हार्दिकला भेटली होती. यानंतर दोघांचे नाते काही वेळातच घट्ट झाले. दोघांनी ३१ मे २०२० रोजी त्यांच्या नात्याचा खुलासा केला. मात्र, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे त्यांचे लग्न होऊ शकले नाही. नंतर १४ फेब्रुवारी २०२३ रोजी उदयपूर येथे हिंदू रितीरिवाजांनुसार त्यांचे लग्न झाले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग