भारत आणि बांगलादेश यांच्यात तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना ६ ऑक्टोबरला ग्वाल्हेर येथे खेळला जाईल. या मालिकेतसाठी अष्टपैलू हार्दिक पंड्या टम इंडियात परतला आहे. पहिल्या टी-20 सामन्यापूर्वी हार्दिक पंड्याने नेटमध्ये खूप घाम गाळला.
फलंदाजीनंतर हार्दिकने बॉलिंगमध्येही मेहनत घेतली, पण नवे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल या भारतीय अष्टपैलू खेळाडूवर खूश नसल्याच्या बातम्या येत आहेत. नेटमध्ये गोलंदाजी करताना मॉर्केलने हार्दिकच्या गोलंदाजीवर बारीक नजर ठेवली होती.
रिपोर्टनुसार, हार्दिक पांड्या जेव्हा नेटमध्ये गोलंदाजी करत होता तेव्हा तो वारंवार चुका करत होता. प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल हार्दिकच्या गोलंदाजीवर बारीक लक्ष ठेवून होते. वास्तविक, गोलंदाजी करताना हार्दिक स्टंपच्या अगदी जवळून गोलंदाजी करत होता.
हार्दिकला हे करताना पाहून मॉर्केलने त्याच्याशी बोलून त्याच्यातील कमतरता सांगितल्या. यानंतर मॉर्केलने हार्दिकच्या रिलीज पॉइंटलाही दुरुस्त केले. यात सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हार्दिकने त्याच्यातील उणिवा मान्य केल्या आणि त्या दूर करून घेतल्या.
गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियामध्ये हार्दिक पांड्यासाठी सर्व काही ठीक नाही. श्रीलंका दौऱ्यावरही हार्दिक सामान्य गोलंदाज दिसला. अशा परिस्थितीत बांगलादेशविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत त्याच्यावर नजर असेल.
हार्दिकला पर्याय म्हणून टीम इंडियाने आणि शिवम दुबे आणि नितीश रेड्डी या अष्टपैलू खेळाडूंचा समावेश केला आहे, ज्याकडे मध्यमगती गोलंदाजीसह वेगाने धावा करण्याची क्षमता आहे.
अशा परिस्थितीत हार्दिक पांड्यासाठी आव्हान खूपच कठीण असणार आहे. जर हार्दिक पांड्या गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्हीमध्ये प्रभावी नसेल तर कदाचित संघ व्यवस्थापन त्याच्या पर्यायांचा शोध घेण्यास मागेपुढे पाहणार नाही. मात्र, हार्दिक पांड्याने यंदाच्या आयसीसी टी-20 विश्वचषकात अप्रतिम कामगिरी केली होती.