Rohit Sharma Retirement : टी-20 विश्वचषक २०२४ जिंकणे ही रोहित शर्मासाठी २०२४ या सालातील एकमेव मोठी उपलब्धी होती. या व्यतिरिक्त टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खूपच वाईट कामगिरी केली आहे. २०२४ मध्ये त्याची वैयक्तिक कामगिरीही फारशी चांगली नव्हती. परिणामी त्याला सिडनी कसोटीतून डच्चू देण्यात.
आता एका मीडिया रिपोर्टमध्ये असे समोर आले आहे की, बीसीसीआयने एकदिवसीय क्रिकेटमध्ये कर्णधार रोहित शर्मा याच्या बदलीचा शोध सुरू केला आहे.
कसोटीतून वगळण्यात आल्यानंतर रोहित शर्माचे वनडे कर्णधारपदही धोक्यात आल्याचे दिसत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, हार्दिक पंड्या हा रोहित शर्माच्या जागी भारताचा एकदिवसीय कर्णधार म्हणून प्रबळ दावेदार म्हणून उदयास आला आहे.
एका रिपोर्टनुसार, हार्दिक पांड्याकडे वनडे संघाची कमान सोपवली जाऊ शकते. आहे. हार्दिक पांड्याने गेल्या २ वर्षात व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये कर्णधारपदाचा भरपूर अनुभव मिळवला आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला दीड महिना बाकी असतानाच अशा चर्चांना उधाण आले आहे. पण चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा संघ आधीच निश्चित झाला आहे, ज्यामध्ये रोहित शर्मा टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
रोहित शर्मा जेव्हा टी-20 मधून निवृत्त झाला तेव्हा हार्दिक पांड्या त्याचा उत्तराधिकारी होईल अशी अटकळ बांधली जात होती, पण नवीन मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी संघ व्यवस्थापनासह टी-20 संघाचे कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे सोपवले होते.
आयपीएलमधील गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल आणि टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव यांची नावे कर्णधारपदासाठी चर्चे आली होती. पण हे पर्याय मॅनेजमेंटने नाकारण्यात आले आहेतत.
रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, 'गिलला कर्णधार म्हणून परिपक्व होण्यासाठी अजून तयारीची गरज आहे. तर सूर्यकुमार यादवची ODI मधील कामगिरी अतिशय खराब आहे. संघातील त्याचे स्थान निश्चित नसताना कर्णधारपदाचा प्रश्नच उद्भवत नाही. अशा परिस्थितीत रोहित नसल्यास वनडेमध्ये भारताचे नेतृत्व करण्यासाठी हार्दिक हा सर्वात संतुलित पर्याय राहील.