Mumbai indians anthem song for IPL 2025 : आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाने आज गुरुवारी (२० मार्च) त्यांचे अँथम सॉंन्ग रिलीज केले. यामध्ये 'मैं नहीं तो कौन बे' मधून प्रसिद्ध झालेल्या सृष्टी तावडे हिने तिचा आवाज दिला आहे तर बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ हाही यात दिसत आहे.
या गाण्यात जॅकी श्रॉफ आणि रोहित शर्मा धमाकेदार एन्ट्री करताना दिसत आहेत. या गाण्याची मुख्य ओळ'प्ले लाइक मुंबई,' आहे.
मुंबई इंडियन्स संघ आयपीएल २०२५ मध्ये पहिला सामना २३ मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळणार आहे. रविवारी होणारा हा सामना दुहेरी हेडरचा दुसरा सामना असेल, जो एमए चिदंबरम स्टेडियमवर संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होईल.
हार्दिक पांड्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. तो रविवारी चेन्नई सुपर किंग्जविरुद्धचा सामना खेळू शकणार नाही. संघाने अधिकृतपणे सांगितले आहे की पहिल्या सामन्यात सध्या टीम इंडियाच्या T20 संघाचा कर्णधार असलेल्या हार्दिक याच्या जागी सूर्यकुमार यादव कर्णधार असेल.
आयपीएलमध्ये सर्वाधिक जेतेपदे जिंकण्याच्या बाबतीत मुंबई इंडियन्स सीएसकेसोबत संयुक्तपणे अव्वल स्थानावर आहे. दोन्ही संघांनी ५-५ आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. यानंतर २०२४ पासून हार्दिक पंड्या या संघाचे नेतृत्व करत आहे.
आयपीएल २०२५ साठी मुंबई इंडियन्सचा संघ- सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, तिलक वर्मा, बेव्हन जेकब्स, रायन रिकेल्टन, रॉबिन मिनेस, कृष्णन सृजित, हार्दिक पांड्या, नमन धीर, राज बावा, विघ्नेश पुथूर, विल जॅक, मिचेल सँटनर, जसप्रीत बुमराह, अर्जुन तेंडुलकर, अश्विनी कुमार, रीस टोपली, कॉर्बिन बॉश, कर्ण शर्मा, ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, सत्यनारायण राजू, मुजीब उर रहमान.
संबंधित बातम्या