मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2024 : रितिका आणि समायरा होळी खेळत होत्या, हार्दिकनं मागून येऊन मिठी मारली, व्हिडीओ पाहा

IPL 2024 : रितिका आणि समायरा होळी खेळत होत्या, हार्दिकनं मागून येऊन मिठी मारली, व्हिडीओ पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 25, 2024 10:39 PM IST

Hardik Hug Rohit Sharma Wife Ritika : मुंबई इंडियन्सच्या होळी सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या हा रोहित शर्माची पत्नी आणि मुलीसोबत होळी खेळताना दिसत आहे.

Hardik Hug Rohit Sharma Wife Ritika : रितिका आणि समायरा होळी खेळत होत्या, हार्दिकनं मागून येऊन मिठी मारली, व्हिडीओ पाहा
Hardik Hug Rohit Sharma Wife Ritika : रितिका आणि समायरा होळी खेळत होत्या, हार्दिकनं मागून येऊन मिठी मारली, व्हिडीओ पाहा

Hardik Pandya Hug Rohit Sharma Wife Ritika Sajdeh : आयपीएल २०२४ चा पाचवा सामना (२४ मार्च) मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबई इंडिन्सला पराभवाचे तोंड पाहावे लागले. मुंबईने शेवटच्या षटकात ६ धावांनी हा सामना गमावला.

पण या सामन्यातील पराभवानंतरही मुंबई इंडियन्सचा संघ जल्लोषात बुडालेला दिसला. वास्तविक, आज सोमवारी (२५ मार्च) देशात होळीचा उत्सव सुरू आहे. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनाही होळीचा आनंद लुटला.

मुंबई इंडियन्सच्या या होळी सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या हा रोहित शर्माची पत्नी आणि मुलीसोबत होळी खेळताना दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओl काय?

वास्तविक, गुजरात टायटन्सविरुद्धच्या पराभवानंतर दुसऱ्याच दिवशी मुंबई इंडियन्सच्या संघाने मोठ्या उत्साहात होळी खेळली. संघातील सर्व खेळाडूंनी यात सहभाग घेतला. या आनंदाच्या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यामध्ये रोहित शर्माची पत्नी रितिका साजेद आपली मुलगी समायरासोबत होळी खेळताना दिसत आहे. तेवढ्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या मागून आला आणि त्याने रितिकाच्या खांद्यावर हात ठेवला. मग रितिकानेही मागे वळून पाहिले आणि दोघांनी मिठी मारली. त्यानंतर हार्दिकने समायराच्या दिशेने हात पुढे केला पण समायराने हार्दिकला पिचकारी मारली.

रोहित आणि हार्दिकमध्ये तणावाचे वातावरण?

दरम्यान, रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्यातील संबंध चांगले नसल्याचे बोलले जात आहे. दोघांमध्ये काहीही अलबेल नसल्याचे अनेक प्रसंगांवरून दिसून आले आहे.

यामागचे कारण मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद आहे. आयपीएल २०२४ आधी मुंबई इंडिन्सच्या मॅनेजमेंटने अचानक रोहित शर्माची कर्णधार पदावरून हकालपट्टी केली आणि हार्दिक पांड्याला कर्णधार बनवले. पण मुंबईला पाचवेळा चॅम्पियन बनवलेल्या रोहितला असे कर्णधारपदावरून काढणे, चाहत्यांना आवडेले नाही.

हार्दिक मुंबईचा कर्णधार झाल्यापासून त्याला रोहित शर्माच्या चाहत्यांकडून द्वेषाचा सामना करावा लागत आहे. आता लाइव्ह मॅचमध्येही चाहत्यांनी त्याच्याबद्दल द्वेष व्यक्त केला.

चाहत्यांनी हार्दिक पांड्याला ट्रोल केलं

गुजरातविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार हार्दिक पांड्या जेव्हा टॉससाठी मैदानात आला तेव्हा मैदानातील चाहत्यांनी त्याला चांगलेच ट्रोल केले. हार्दिकला रोहित शर्माच्या जागी कर्णधार बनवण्यात आले, तेव्हापासून तो चाहत्यांच्या टार्गेटवर आहे. हार्दिक गोलंदाजीला आला तेव्हादेखील चाहत्यांनी रोहित-रोहित अशा घोषणा द्यायला सुरुवात केली.

WhatsApp channel