Hardik Pandya Suryakumar Yadav : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या बांगलादेशविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील स्टार होता. हार्दिकला त्याच्या दमदार खेळासाठी मालिकावीर म्हणूनही निवडण्यात आले. हार्दिकने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रात कमाल केली. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखाली हार्दिक पांड्या आणखीनच सुधारला आहे.
एक काळ असा होता की सूर्यकुमार यादव हा हार्दिकच्या नेतृत्वाखाली खेळत असे, पण आता हार्दिक सूर्याच्या नेतृत्वात खेळत आहे. अशा स्थितीत कर्णधारपद सोडल्यानंतरही हार्दिकच्या कामगिरीत कोणतीही घट झालेली नाही.
हार्दिक आणि सूर्यकुमार यादव यांच्यात क्रिकेटच्या मैदानावरही चांगले बॉन्डिंग आहे. मात्र, सोशल मीडियावर हार्दिकबद्दल काही औरच चर्चा सुरू आहे. बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यातील विजयानंतर हार्दिक पांड्याने त्याच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोत तो संघातील खेळाडू आणि प्रशिक्षकासोबत दिसत होता, मात्र या फोटोंवरून वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.
हार्दिक पांड्या क्रिकेटच्या मैदानावर असतो, तेव्हा त्याचे सूर्यकुमार यादवसोबत चांगले बॉन्डिंग पाहायला मिळते, सोशल मीडियावर काही वेगळेच असते. हार्दिकच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये सूर्यासोबत फोटो नसतात किंवा हार्दिक सूर्याला वेगळे क्रेडिटही देत नाही, असे चाहत्यांचे म्हणणे आहे.
वास्तविक, हार्दिक पांड्याने या मालिका विजयाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
हार्दिकने काही फोटो त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात सूर्या कुठेही नाही. मात्र, असे घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही हार्दिक पांड्याच्या फोटोतून कर्णधार गायब आहे. त्यामुळे हार्दिक आता मैदानावर फक्त नाटक करतो का असा सवाल चाहते करत आहेत.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसरा टी-20 सामना शनिवारी (१२ ऑक्टोबर) हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत २९७ धावांची विक्रमी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ केवळ १६४ धावा करू शकला. अशा प्रकारे भारताने हा सामना १३३ धावांनी जिंकला.