Hardik Pandya : हार्दिक पंड्या याचं वनडेतील पुनरागमन फ्लॉप, बंगालनं उडवला बडोद्याचा धुव्वा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Hardik Pandya : हार्दिक पंड्या याचं वनडेतील पुनरागमन फ्लॉप, बंगालनं उडवला बडोद्याचा धुव्वा

Hardik Pandya : हार्दिक पंड्या याचं वनडेतील पुनरागमन फ्लॉप, बंगालनं उडवला बडोद्याचा धुव्वा

Dec 28, 2024 07:44 PM IST

Baroda vs Bengal : विजय हजारे ट्रॉफी सामन्यात बंगालने बडोद्याचा पराभव केला. या सामन्यात हार्दिक पांड्या सुपर फ्लॉप झाला. कृणालही विशेष काही करू शकला नाही.

Hardik Pandya : हार्दिक पंड्या याचं वनडेतील पुनरागमन फ्लॉप, बंगालनं उडवला बडोद्याचा धुव्वा
Hardik Pandya : हार्दिक पंड्या याचं वनडेतील पुनरागमन फ्लॉप, बंगालनं उडवला बडोद्याचा धुव्वा (PTI)

Baroda vs Bengal Vijay Hazare Trophy : हार्दिक पांड्या याने नुकतेच बडोद्याकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. पण तो कमबॅक सामन्यात फ्लॉप झाला. विजय हजारे ट्रॉफी २०२४ च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये हार्दिक खेळू शकला नाही.

त्याने १३ डिसेंबर रोजी बडोद्यासाठी शेवटचा सामना खेळला होता. पण आता तो आज (२८ डिसेंबर) शनिवारी पुन्हा मैदानात आला. यादरम्यान तो केवळ १ धाव काढून बाद झाला. या सामन्यात बंगालने बडोद्याचा ७ विकेटने पराभव केला.

प्रथम फलंदाजी करताना बडोद्याने २२८ धावा केल्या. यादरम्यान शाश्वत रावतने ९५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याने १० चौकार आणि २ षटकार मारले. निनादने २८ धावा केल्या. मात्र हार्दिक पांड्याला विशेष काही करता आले नाही. त्याने २ चेंडूंचा सामना केला आणि १ धाव करून तो बाद झाला.

कर्णधार कृणाल पंड्याही फ्लॉप झाला. तो ३ धावा करून बाद झाला. भानू पुनियाने ४१ धावा केल्या. यादरम्यान बंगालसाठी घातक गोलंदाजी करताना मुकेश कुमारने २ बळी घेतले. सायन घोष आणि प्रदिप्ता प्रामाणिक यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले.

बंगालने सामना सहज जिंकला

बडोद्याच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बंगालच्या संघाने अवघ्या ४३ षटकांत सामना जिंकला. त्यांच्याकडून अनुस्तुप मजुमदारने नाबाद ९९ धावा केल्या. १०६ चेंडूंचा सामना करताना त्याने १२ चौकार आणि १ षटकार लगावला. सुमंत गुप्ताने ४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने नाबाद ६९ धावा केल्या. बंगालने हा सामना ७ विकेटने जिंकला.

हार्दिक २०२३ पासून वनडेतून बाहेर

पांड्या बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियाच्या वनडे संघातून बाहेर आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये त्याने भारतासाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. शेवटचा कसोटी सामना सप्टेंबर २०१८ मध्ये खेळला गेला होता. पंड्या नोव्हेंबर २०२४ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्याने नोव्हेंबरमध्ये भारतासाठी शेवटचा T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.

Whats_app_banner

संबंधित बातम्या