अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक आणि क्रिकेटर हार्दिक पांड्या यांनी या वर्षी जुलैमध्ये नाते संपुष्टात आणले. ४ वर्षांच्या लग्नानंतर दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून घटस्फोटाची घोषणा केली. विभक्त झाल्यानंतर, नताशा स्टॅनकोविक काही काळ तिचा मुलगा अगस्त्यासोबत सर्बियामध्ये होती. पण आता तिच्या एका विधानाने नवी चर्चा सुरू झाली आहे.
अलीकडेच, ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत नताशा स्टॅनकोविक हिने तिचा घटस्फोट, तिचा मुलगा आणि हार्दिकसोबतच्या नात्याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. याशिवाय भारत सोडून सर्बियाला परत जाण्याच्या अफवांवरही ती उघडपणे बोलली आहे.
नताशा म्हणाली की, त्यांच्या मुलामुळे ती आणि हार्दिक आजही एका कुटुंबासारखे आहेत. नताशा पुढे म्हणाली की ती परत जाणार नाही, तिला एक मूल आहे जो याच देशाचा नागरिक आहे.
नताशा स्टॅनकोविकने हार्दिक पांड्या आणि तिचा मुलगा अगस्त्या यांच्याबाबत अगदी खुलेपणाने वक्तव्य केले आहे. या जोडप्याचा घटस्फोट झाला असला तरी ते अजूनही आपल्या मुलासाठी एकमेकांना कुटुंब मानतात, हे तिच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते. अलीकडेच हार्दिक पांड्याने आपल्या मुलाची भेट घेतली होती. या भेटीचे फोटोही सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते.
२०२० मध्ये हार्दिक पांड्याने नताशा स्टॅनकोविच हिला क्रूझवर फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोज केले होते आणि नंतर कोरोना महामारीच्या काळात दोघांनी लग्नही केले होते. मात्र, काही काळानंतर त्यांनी राजस्थानमध्ये पुन्हा भव्य विवाह सोहळा आयोजित केला. एवढे होऊनही त्यांचे लग्न केवळ ४ वर्षे टिकले आणि यावर्षी १८ जुलै रोजी हार्दिक आणि नताशा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून घटस्फोटाची घोषणा केली.