भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांनी जोर पकडला आहे. हार्दिकला त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक घटस्फोट देणार आहे. एवढेच नाही तर पंड्याला ७० टक्के संपत्तीही नताशाला द्यावी लागणार आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
पण या प्रकरणात हार्दिकच्या दृष्टीने एक चांगली गोष्ट आहे. हार्दिकने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, त्याने घर आणि कार आईच्या नावावर घेतली होती आणि बऱ्यापैकी प्रॉपर्टी ही त्याच्या आईच्या नावावर आहे. जर असे अलेल तर नताशाला काहीच मिळणार नाही.
वास्तविक, पंड्या आणि नताशाच्या प्रकरणानंतर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये हार्दिक पंड्या त्याच्या मालमत्तेबद्दल बोलताना दिसत आहे. तो म्हणाला, “माझ्या वडिलांच्या खात्यात आईचे नाव आहे. माझ्या भावाच्या खात्यातही आईचे नाव आहे. सर्व काही तिच्या नावावर आहे. माझी कार, माझे घर आणि इतर सर्व काही. मी ते माझ्या नावावर करणार नाही. पुढे जाऊन मला ५० टक्के वाटा कोणाला द्यायचा नाही. मला काहीही झाले तरी ५० टक्के नुकसान होणार नाही”.
घटस्फोटाच्या बाबतीत अनेकदा मालमत्तेचा प्रश्न अडकतो. पांड्या आणि नताशा यांचा घटस्फोट झाला तर या प्रकरणातही संपत्ती येऊ शकते. जर पंड्याने खरोखरच त्याची मालमत्ता त्याच्या आईच्या नावावर घेतली असती तर नताशाला यातील काहीच मिळणार नाही. आईच्या नावावर मालमत्ता असणे हे हार्दिकसाठी ट्रम्प कार्ड ठरू शकते.
पंड्या करोडोंच्या मालमत्तेचा मालक आहे. तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो. मुंबई त्याला १५ कोटी रुपये पगार देते. टीम इंडियातूनही तो चांगली कमाईही करते. पांड्या जाहिरातींमधूनही करोडोंची कमाई करतो.
आयपीएल २०२४ हार्दिक पांड्यासाठी चांगले नव्हते. मुंबई इंडियन्सने त्याला कर्णधार बनवले. पण पंड्याच्या नेतृत्वात संघ चांगलाच फ्ल़ॉप झाला. याशिवाय त्याची वैयक्तिक कामगिरीही अत्यंत खराब होती. त्यामुळे पांड्याला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले.