हार्दिक पंड्या खरा हिरा, चाहत्यांनी ट्रोल केलं, भरभरून प्रेमही दिलं; ६ महिन्यात काय घडलं, सगळंच सांगितलं
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  हार्दिक पंड्या खरा हिरा, चाहत्यांनी ट्रोल केलं, भरभरून प्रेमही दिलं; ६ महिन्यात काय घडलं, सगळंच सांगितलं

हार्दिक पंड्या खरा हिरा, चाहत्यांनी ट्रोल केलं, भरभरून प्रेमही दिलं; ६ महिन्यात काय घडलं, सगळंच सांगितलं

Jun 30, 2024 11:43 AM IST

Hardik Pandya, T20 World Cup 2024 final : टीम इंडियाने विजेतेपद पटकावल्यानंतर हार्दिक पांड्या ढसाढसा रडला. भारताच्या विजयानंतर त्याने आपली व्यथा मांडली.

Hardik Pandya : हार्दिक पंड्या खरा हिरा, चाहत्यांनी ट्रोल केलं, भरभरून प्रेमही दिलं; ६ महिन्यात काय घडलं, सगळंच सांगितलं
Hardik Pandya : हार्दिक पंड्या खरा हिरा, चाहत्यांनी ट्रोल केलं, भरभरून प्रेमही दिलं; ६ महिन्यात काय घडलं, सगळंच सांगितलं

टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप २०२४ चे विजेतेपद पटकावले आहे. भारताच्या विजयात अष्टपैलू हार्दिक पांड्याने महत्त्वाची भूमिका बजावली. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात पंड्याने ३ षटकात केवळ २० धावा देत ३ बळी घेतले.

दक्षिण आफ्रिकेच्या डावातील शेवटचे षटकही हार्दिक पंड्याने टाकले, जे खूप महत्त्वाचे होते. या षटकात त्याला १६ धावांचा बचाव करायचा होता, तो त्याने जबरदस्त पद्धतीने केला.

दरम्यान, भारताच्या विजयानंतर हार्दिक पंड्या ढसाढसा रडला. त्याने आपली व्यथा मांडली. गेले ६ महिने किती कठीण गेले हे त्याने सांगितले आहे.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाल्यावर ट्रोलिंगचा शिकार

वास्तविक, IPL २०२४ पासून हार्दिक पांड्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर होता. पांड्याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवण्यात आले. रोहित शर्माला मुंबईच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले. यानंतर पांड्या खूप ट्रोल झाला. आयपीएल २०२४ चा हंगामही त्याच्यासाठी चांगला नव्हता.

पण २०२४ च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील विजयानंतर तो स्वत:ला रोखू शकला नाही, त्याने आपल्या सगळ्या भावना बोलून दाखवल्या आणि मोकळ झाला.

वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर हार्दिक म्हणाला, ‘माझ्यासाठी ६ महिने खूप वाईट गेले. हे महिने कसे घालवले ते मी सांगू शकत नाही. मला रडायचे होते तेव्हाही मी रडलो नाही. कारण मला ते लोकांना दाखवायचे नव्हते. माझ्या कठीण काळात जे आनंदी होते त्यांना मला जास्त आनंद द्यायचा नव्हता. माझे ६ महिने कसे गेले हे महत्त्वाचे नाही, आज देवाने मला अशी संधीही दिली की मला शेवटचे षटक टाकायला मिळाले.

हार्दिक खरा हिरा

कपिल देव यांनी १९९४ मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तेव्हापासून, भारताला वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडूची गरज होती. कपिल देव यांच्यानंतर अजित आगरकर, इरफान पठाण, विजय शंकर ते आता शिवम दुबे अशी अनेक नावं आली. पण हे खेळाडू दोन्ही विभागात म्हणजेच फलंदाजी आणि गोलंदाजीत टॉपर नव्हते. मात्र, हार्दिक पंड्याने कपिल देव यांची उणीव भरून काढली.

चाहत्यांनी ट्रोल केलं, भरभरून प्रेमही दिलं

हार्दिक पांड्या हा भारतीय क्रिकेट संघातील सर्वात खास खेळाडूंपैकी एक आहे. त्याच्याकडे असलेले कौशल्य भारतातील काही मोजक्याच खेळाडूंकडे आहे. यानंतर सर्वाधिक ट्रोल होणाऱ्या क्रिकेटपटूंमध्येदेखील हार्दिकचा समावेश आहे. २०१५ मध्ये हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सने विकत घेतले होते, तो आज या संघाचा कर्णधार आहे. पहिल्याच आयपीएल सीझनमध्ये छाप पाडल्यानंतर त्याला २०१६ मध्ये भारताकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली. आता हार्दिक टी-20 विश्वचषक विजेता ठरला आहे.

शेवटच्या षटकात ८ धावांत २ बळी घेतले

टी-20 विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना १७६ धावा केल्या होत्या. यादरम्यान विराट कोहलीने ७६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ १६९ धावा करू शकला. कर्णधार रोहितने दक्षिण आफ्रिकेच्या डावातील शेवटचे षटक पांड्याला दिले. या षटकात त्याने ८ धावांत २ बळी घेतले.

Whats_app_banner