hardik pandya and natasha Divorce : आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून हार्दिक पांड्या सुपर फ्लॉप ठरला. त्यांचा संघ एमआय गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर राहिला. आता क्रिकेटच्या मैदानावरील खराब कामगिरीनंतर त्याचे लग्नही धोक्यात आल्याच्या बातम्या समोर येत आहेत.
वास्तविक, हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविच घटस्फोट घेणार असल्याचा दावा लोक सोशल मीडियावर करत आहेत. अनेक कारणांमुळे त्यांच्या विभक्त होण्याच्या बातम्यांना वेग आला आहे.
विशेष म्हणजे, नताशाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून 'पंड्या' हे आडनाव काढून टाकले आहे आणि तिच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवरून हार्दिक आणि त्याच्यासोबत पोस्ट केलेले फोटो देखील हटवले आहेत. यामुळे त्यांच्या विभक्त होण्याच्या बातम्या वेगाने समोर येत आहे.
नताशाच्या अकाऊंटवर हार्दिक आणि नताशाचा एकच फोटो आहे ज्यामध्ये ते एकत्र दिसत आहेत आणि हा फोटो त्यांचा मुलगा अगस्त्यासोबत आहे.
त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर येण्यामागचे दुसरे मोठे कारण म्हणजे या दोघांनी बराच काळ सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर केलेले नाहीत. ४ मार्चला नताशाचा वाढदिवस होता, पण हार्दिकने तिला शुभेच्छा देण्यासाठी काहीही पोस्ट केले नाही. यावेळी नताशा संपूर्ण आयपीएल २०२४ सीझनमध्ये हार्दिकच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी एकदाही मैदानात आली नाही.
सोशल मीडियावर लोक विशेषतः हार्दिकसाठी अपमानास्पद कमेंट करत आहेत. हार्दिक पंड्याने नताशाची फसवणूक केली असून तो लंडनमध्ये आणखी एका मुलीसोबत दिसल्याचेही दावा केला जात आहे.
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांची भेट सुमारे ७ वर्षांपूर्वी झाली होती. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ३१ मे २०२० रोजी त्यांनी कोर्ट मॅरेज केले. जुलै २०२० मध्ये त्यांना एक मुलगा झाला. त्याचे नाव अगस्त्य आहे.