टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी नेहमीच मैदानावर आपल्या सहकारी खेळाडूंना मदत करतो. धोनी एक कर्णधार, एक लीडर आणि गुरू म्हणून मदत करायला पुढे येतो.
पण मैदानावर अशीही एक घटना घडली होती, जेव्हा धोनीने शार्दुल ठाकूरला मदत करण्यास नकार दिला होता. खरे तर हे प्रकरण आयपीएलचे आहे, जेव्हा धोनी आणि शार्दुल ठाकूर एकत्र सीएसकेकडून खेळायचे.
टीम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग देखील २०१८-२०२० दरम्यान CSK कडून खेळला होता आणि आता त्यानेच एमएस धोनीचा एक किस्सा सांगितला आहे.
हरभजनच्या म्हणाला की, एमएस धोनी कधीच सामन्याच कंट्रोल स्वताच्या हातात मिळवण्याचा प्रयत्न करत नाही, उलट तो आपल्या सहकारी गोलंदाजांना पाठिंबा देण्याचा प्रयत्न करतो.
भज्जी पुढे म्हणाला, "मला एक सामना आठवतो जेव्हा आम्ही CSK कडून खेळत होतो. धोनी यष्टिरक्षक होता, मी शॉर्ट फाईन लेग पोझिशनवर उभा होतो. शार्दुल ठाकूर गोलंदाजी करत होता आणि केन विल्यमसनने त्याच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारला.
पुढचा चेंडू त्याच लेन्थवर आला आणि विल्यमसनने त्याच शॉटची पुनरावृत्ती केली. मी धोनीकडे गेलो आणि त्याला शार्दुलकडे जाऊन लेंथ बदलण्यास सांगायला सांगितले.
हरभजन पुढे म्हणाला, "यानंतर धोनीने मला सांगितले, 'पाजी जर मी त्याला आज सांगितले तर तो कधीच शिकणार नाही. त्याला स्वतःला लेंथ कळली पाहिजे.' चौकार आणि षटकार पडल्यानंतर शार्दुल स्वतः शिकेल, अशी धोनीची पद्धत होती.
महेंद्रसिंह धोनी त्याच्या संयमशील स्वभावासाठी ओळखला जातो, तो मैदानात संयमाने काम करतो, म्हणून त्याला कॅप्टन कूल म्हणूनही ओळखले जाते.
त्याचे कौतुक करताना हरभजन म्हणाला, "धोनी नेहमी संयमाने काम करतो. त्याच्याबद्दलची दुसरी सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याला काय साध्य करायचे आहे यासाठी तो स्पष्ट दृष्टीकोन समोर ठेवतो. धोनीची तिसरी खासियत म्हणजे त्याच्यात जिंकण्याची क्षमता आहे. याचा संपूर्ण संघावर सकारात्मक परिणाम होतो."