World Cup 2023: आगामी विश्वचषकापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेला येत्या २२ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. बीसीसीआयने सोमवारी या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. ज्यात भारताचा अनुभवी गोलंदाज आर अश्विन आणि युवा फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर या दोघांचा समावेश करण्यात आला आहे. यावर भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंहने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, हरभजन सिंह म्हणाला की, “पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आशिया चषकात वॉशिंग्टन सुंदर भारताच्या मुख्य संघाचा भाग नव्हता. त्याचा नंतर संघात समावेश करण्यात आला. दुसरी गोष्ट म्हणजे अश्विनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेत संधी देण्यात आली. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, भारतीय संघ ऑफ स्पिनरच्या शोधात आहे. ऑफ स्पिनरचा संघात समावेश न करुन त्यांनी किती मोठी चूक केलीय, हे त्यांच्या लक्षात आले आहे”
पुढे हरभजन सिंह म्हणाला की, “तुम्ही संघात तीन स्पिनर ठेवू शकत नाहीत. फक्त दोनच स्पिनरला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवले पाहिजे. रवींद्र जाडेजाची संघाचा आघाडीचा फिरकी गोलंदाज आहे. कुलदीप यादव सध्या तुफान फॉर्नमध्ये असून तोही निश्चितपणे संघाच्या प्लेईंग इलेव्हनचा भाग असेल.” आशिया चषकात कुलदीप यादवने उत्कृष्ट गोलंदाजी केली. कुलदीपने ५ सामन्यात १०३ धावा देऊन ९ विकेट्स घेतल्या. तर, जाडेजाने ६ सामन्यात ६ विकेट्स घेतल्या आहेत. या स्पर्धेत युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. सिराजने ५ सामन्यात ५ विकेट्स घेतल्या. याशिवाय, ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने ५ सामन्यात ६ विकेट्स घेतल्या.
केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड़, श्रेयस अय्यर, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा, आर अश्विन, वॉशिंग्टन सुंदर.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकुर, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, आर अश्विन, वॉशिंग्टन सुंदर.
संबंधित बातम्या