T20 World Cup 2024: वेस्ट इंडीज आणि अमेरिका येथे खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषकावर भारताने मोहर उमटवली. दुसरीकडे भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला साखळी सामन्यातच सामान गुंडळावे लागले. यामुळे पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला सर्व स्तरातून टीकेला सामोरे जावे लागत आहे. यंदााच्या टी-२० विश्वचषकातही बाबरला खराब फॉर्मचा शिकार ठरला. आयसीसीच्या मागील दोन स्पर्धांमध्ये त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने खराब कामगिरी केल्यामुळे बाबर चौकशीच्या फेऱ्यात सापडला आहे. पाकिस्तानच्या अनेक माजी क्रिकेटपटूंनी बाबरच्या फलंदाजीच्या दृष्टिकोनावर टीका करण्यास मागेपुढे पाहिले नाही .
नुकताच हरभजन सिंह आणि एस श्रीसंत यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात ब्रायन लारा आणि बाबर आझम यांच्यापैकी एकाची निवड करण्यास सांगितल्यावर हरभजन सिंह पोट धरून हसला. स्टार स्पोर्ट्सच्या कॅच अँड बोल्ड शोमधील ही क्लिप आहे. यजमानांनी हरभजन आणि श्रीसंतला लारा आणि संगकारा यांच्यापैकी एकाची निवड करण्यास सांगितले आणि श्रीसंतने विंडीजच्या महान खेळाडूची निवड केली. पण हरभजन आणि श्रीसंत स्वत:वर नियंत्रण ठेवू शकले नाहीत आणि ते लाइव्ह शोमध्ये मोठ्या- मोठ्याने हसले. मात्र, पाकिस्तानच्या कर्णधार बाबर आझमच्या चाहत्यांनी त्याच्या समर्थनार्थ हरभजनच्या प्रतिक्रियेला असंवेदनशील म्हटले आहे.
दरम्यान, टी-२० विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर बाबरने पाकिस्तानचा पांढऱ्या चेंडूचा कर्णधार म्हणून आपल्या भवितव्याबद्दल सांगितले. बाबरने पुन्हा एकदा कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यास सर्वांना खुलेपणाने सांगू, असे अश्वासन दिले.
भारताने तब्बल ११ वर्षानंतर टी-२० विश्वचषक जिंकला आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारताने पहिल्यांदा टी-२० विश्वचषकावर नाव कोरले. आयसीसी ट्रॉफीबद्दल बोलायचे झाले तर, भारताने माजी कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्त्वात १९८३ मध्ये पहिल्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला. त्यावेळी भारताने बलाढ्य वेस्ट इंडीज पराभव करून संपूर्ण जगाला आपली क्षमता दाखवून दिली. त्यानंतर २८ वर्षाने भारताने २०११ मध्ये दुसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला. त्यानंतर धोनीच्या नेत्तृत्वात २०१३ चॅम्पियन ट्रॉफी जिंकली. यानंतर आयसीसी ट्रॉफी जिंकण्यासाठी भारतीयांना ११ वर्ष प्रतिक्षा करावी लागली, यावर रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने पूर्णविराम लावले.
संबंधित बातम्या