NZ vs ENG Test Gus Atkinson Takes Hat-trick : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज गस एटकिन्सन याने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत हॅटट्रिक घेत इतिहास रचला आहे. वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व्हवर सलग तीन चेंडूत तीन बळी घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे.
गस एटकिन्सन याने नॅथन स्मिथ, मॅट हेन्री आणि टिम साऊदी यांना सलग चेंडूंवर बाद केले. त्याच्या घातक गोलंदाजीमुळे किवी संघ पहिल्या डावात केवळ १२५ धावांवर आटोपला. इंग्लंडने पहिल्या डावात २८० धावा केल्या होत्या, त्यामुळे पहिल्या डावानंतर इंग्लिश संघाला १५५ धावांची आघाडी मिळविण्यात यश आले.
एकिन्सनने कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ४८ वी हॅटट्रिक घेतली आहे. त्याचबरोबर इंग्लंडकडून हॅटट्रिक घेणारा तो १५ वा खेळाडू ठरला. २०१७ नंतर एका गोलंदाजाने इंग्लिश संघासाठी हॅटट्रिक केली आहे. मोईन अलीने ७ वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अशी कामगिरी केली होती.
विशेष म्हणजे, जून २०२१ नंतर कसोटी हॅटट्रिक घेणारा गस एटकिन्सन हा जगातील पहिला गोलंदाज आहे. कसोटी क्रिकेटमध्ये केशव महाराज याने तीन वर्षांपूर्वी वेस्ट इंडिजविरुद्ध सलग तीन चेंडूत तीन विकेट्स घेतल्या होत्या.
महाराजने वेस्ट इंडिजविरुद्ध लागोपाठ चेंडूंवर किरण पॉवेल, जेसन होल्डर आणि जोशुआ दा सिल्वा यांना बाद केले होते.
इंग्लंडसाठी शेवटची कसोटी हॅट्ट्रिक मोईन अलीने ओव्हल येथे जुलै २०१७ मध्ये घेतली होती, जेव्हा त्याने दक्षिण आफ्रिकेच्या डीन एल्गर, कागिसो रबाडा आणि मोर्ने मॉर्केल यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते.
संबंधित बातम्या