मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  GT Vs SRH Highlights : मिलरने षटकार मारून सामना संपवला, हैदराबादचा शेवटच्या षटकात पराभव

GT Vs SRH Highlights : मिलरने षटकार मारून सामना संपवला, हैदराबादचा शेवटच्या षटकात पराभव

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 31, 2024 06:58 PM IST

GT Vs SRH IPL 2024 : आयपीएल २०२४ च्या १२ व्या सामन्यात गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादचा ७ विकेट्सने पराभव केला आहे. गुजरात टायटन्सकडून डेव्हिड मिलर आणि साई सुदर्शन यांनी शानदार खेळी खेळली. गुजरातचा हा तीन सामन्यांतील दुसरा विजय ठरला.

Gujarat Giants Vs Sunrisers Hyderabad Match Scorecard
Gujarat Giants Vs Sunrisers Hyderabad Match Scorecard (AP)

आयपीएल २०२४ च्या १२ व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने होते. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरातला विजयासाठी १६३ धावांचे लक्ष्य होते, जे त्यांनी ५ चेंडू बाकी असताना पूर्ण केले.

गुजरात टायटन्ससाठी इम्पॅक्ट प्लेयर साई सुदर्शनने ३६ चेंडूंत ४ चौकार आणि १ षटकारासह सर्वाधिक ४५ धावा केल्या. तर डेव्हिड मिलरने २७ चेंडूत ४४ धावांची नाबाद खेळी केली. मिलरने आपल्या खेळीत ४ चौकार आणि २ षटकार मारले.

गुजरातला शेवटच्या षटकात विजयासाठी एका धावेची गरज होती. चेंडू जयदेव उनाडकटच्या हातात होता. तर स्ट्राईकवर डेव्हिड मिलर होता, मिलरने २०व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार खेचून सामना संपवला.

या विजयासह गुजरात टायटन्स संघ तीन सामन्यांतून दोन विजय आणि ४ गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. याचबरोबर हैदराबादचा संघ तीन सामन्यांत एक विजय आणि दोन गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.

दरम्यान, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने २० षटकांत ८ गडी गमावून १६२  धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातने १९.१ षटकांत तीन गडी गमावून लक्ष्य गाठले. डेव्हिड मिलरने विजयी शॉट मारला. २०व्या षटकात जयदेव उनाडकटच्या पहिल्या चेंडूवर त्याने लाँग ऑफवर षटकार ठोकला.

गुजरातकडून साई सुदर्शनने ४५ धावांची खेळी केली. २६ चेंडूंचा सामना करताना त्याने ४ चौकार आणि १ षटकार लगावला. विजय शंकर १४ धावा करून नाबाद राहिला. 

गुजरातकडून मोहित शर्माने गोलंदाजीत अप्रतिम कामगिरी केली. त्याने ३ बळी घेतले. उमेश यादव, राशिद खान, उमरझाई आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

हैदराबादचा डाव

हैदराबादकडून अब्दुल समद आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी २९-२९ धावा केल्या. या सामन्यात हैदराबादचे स्टार फलंदाज कमाल दाखवू शकले नाहीत. मात्र अब्दुल समद आणि शाहबाज अहमद यांनी सहाव्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी करून संघाला संकटातून बाहेर काढले.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या सनरायझर्स हैदराबादने पहिल्या ४ षटकांत चांगली सुरुवात केली होती आणि वेगाने धावा केल्या होत्या. परंतु पहिली विकेट पडल्यानंतर धावांचा वेग कमी झाला. हैदराबादने १५ व्या षटकात केवळ ११४ धावांवर ५ विकेट गमावल्या होत्या.

त्यानंतर समद आणि शाहबाज यांनी सहाव्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी केली. यामुळे हैदराबाद १७० धावा ओलांडणार असे वाटत असतानाच अखेरच्या षटकात पुन्हा गुजरातच्या गोलंदाजांनी डाव उलटवला. मोहित शर्माने शेवटच्या षटकात केवळ ३ धावा देत ३ फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तर एक फलंदाज धावबाद झाला.

तत्पूर्वी, हेन्रिक क्लासेनने नूर अहमदला लागोपाठ दोन षटकार ठोकले, पण त्यानंतर रशीद खानने क्लासेनला बाद केले. क्लासेन १३ चेंडूत २४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. क्लासेनच्या बॅटमधून १ चौकार आणि २ षटकार आले.

 

WhatsApp channel