मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  संजूच्या राजस्थान रॉयल्सचा विजयरथ थांबला, गुजरातच्या राशीद खाननं शेवटच्या चेंडूवर विजय खेचून आणला

संजूच्या राजस्थान रॉयल्सचा विजयरथ थांबला, गुजरातच्या राशीद खाननं शेवटच्या चेंडूवर विजय खेचून आणला

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 10, 2024 11:55 PM IST

RR vs GT Indian Premier League 2024 : आयपीएल २०२४ मध्ये राजस्थान रॉयल्सचा विजयरथ थांबला आहे. आज झालेल्या सामन्यात गुजरातने शेवटच्या चेंडूवर राजस्थानचा पराभव केला.

Rajasthan Royals vs Gujarat Titans
Rajasthan Royals vs Gujarat Titans (ANI)

आयपीएल २०२४ गुजरात टायटन्सने (GT) आज धमाकेदार कामगिरी केली आहे. बुधवारी (१० एप्रिल) जयपूर येथे झालेल्या सामन्यात गुजरातने राजस्थान रॉयल्सचा (RR) ३ गडी राखून पराभव केला. राजस्थानचा या मोसमातील हा पहिलाच पराभव आहे.

ट्रेंडिंग न्यूज

संजूच्या नेतृत्वाखालील राजस्थान संघाने या मोसमातील सुरुवातीचे चारही सामने जिंकले होते. मात्र पाचव्या सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. दुसरीकडे, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाचा ६ सामन्यांमधील हा तिसरा विजय आहे.

या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना १९६ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातने ७ गडी गमावून सामना जिंकला. अखेरच्या चेंडूवर संघाने सामना जिंकला. राजस्थानकडून संजू सॅमसनने नाबाद ६८ धावांची खेळी केली. रियान परागने ७६ धावा केल्या. गुजरातकडून उमेश यादव, राशिद खान आणि मोहित शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

शेवटच्या षटकात गुजरातला विजयासाठी १५ धावांची आवश्यकता होती. राशीद खानने या धावा पूर्ण केल्या. शेवटच्या चेंडूवर २ धावंची गरज असताना त्याने चौकार मारला. राजस्थानकडून शेवटचे षटक आवेश खानने टाकले.

राजस्थानचा डाव

तत्पूर्वी, या सामन्यात राजस्थानकडून यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलर यांच्यात पहिल्या विकेटसाठी ३२ धावांची भागीदारी झाली. जैस्वाल ५ चौकारांच्या मदतीने २४ धावा करून बाद झाला, तर गेल्या सामन्यात नाबाद शतक झळकावणाऱ्या बटलरला केवळ ८ धावा करता आल्या. राशिद खानने त्याला आपला शिकार बनवले. या फिरकीपटूने अनुभवी फलंदाजाला टी-20 क्रिकेटमध्ये पाचव्यांदा बाद केले.

यानंतर संजू सॅमसन आणि रियान पराग यांनी डाव सांभाळला. दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी १३० धावांची मोठी भागीदारी झाली.

या सामन्यात दोघांनी अर्धशतके झळकावली. रियानने ३४ चेंडूत ५० धावा पूर्ण केल्या. आयपीएलच्या १७ व्या मोसमातील हे त्याचे तिसरे अर्धशतक आहे. त्याचवेळी कर्णधार संजूने ३१ चेंडूत अर्धशतक झळकावले. आयपीएलच्या या मोसमातील त्याचे कारकिर्दीतील हे तिसरे अर्धशतक आहे. यासह तो राजस्थानसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. दोघांची ही भागीदारी मोहित शर्माने तोडली.

त्याने शेवटच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रियान परागला बाद केले, त्याने ७६ धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ३ चौकार आणि ५ षटकार आले. शिमरॉन हेटमायर पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येताच त्याने १ चौकार आणि १ षटकार मारला. ५ चेंडूत १३ धावा करून तो नाबाद राहिला. त्याचवेळी संजूने ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६८ धावा केल्या. तोही नाबाद राहिला. गुजरातकडून उमेश यादव, रशीद खान आणि मोहित शर्मा यांना प्रत्येकी एक विकेट घेतला.

IPL_Entry_Point