इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2024) पाचवा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात गुजरात टायटन्स (GT) आणि मुंबई इंडियन्स (MI) हे संघ आमनेसामने आहेत. नाणेफेक हरल्यानंतर गुजरातने प्रथम फलंदाजी करत मुंबईसमोर १६९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
या सामन्यात शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरातने ६ विकेट्सवर १६८ धावा केल्या. साई सुदर्शनने संघाकडून सर्वाधिक ४५ धावा केल्या. याशिवाय गिलने ३१ धावा केल्या. तर मुंबईकडून जसप्रीत बुमराहने १४ धावांत ३ बळी घेतले. जेराल्ड कोएत्झीला २ आणि पियुष चावलाला १ विकेट मिळाला.
तत्पूर्वी, गुजरातने ३१ धावांवर पहिली विकेट गमावली. जसप्रीत बुमराहने रिद्धिमान साहाला (१९) क्लीन बोल्ड केले. यानंतर ६२ धावांवर शुबमन गिलच्या (३१) रूपाने संघाने दुसरी विकेट गमावली. पियुष चावलाने त्याला शिकार बनवले. गुजरातने १०४ धावांवर उमरझाईच्या (१७) रूपाने तिसरी विकेट गमावली.
शेवटी राहुल तेवतियाने १५ चेंडूत २२ धावा करून संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले.
गुजरात टायटन्स: शुभमन गिल (कर्णधार), रिद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुधारसन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, रविश्रीनिवासन साई किशोर, स्पेन्सर जॉन्सन
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर),तिलक वर्मा, नमन धीर, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, शम्स मुलानी, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, ल्यूक वुड.
संबंधित बातम्या