भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेल याची गुजरात टायटन्सने इंडियन प्रीमियर लीग २०२५ (IPL 2025) पूर्वी सहाय्यक आणि फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. पार्थिव पटेल आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज, कोची टस्कर्स केरळ, डेकर चार्जर्स, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि मुंबई इंडियन्स या फ्रँचायझीकडून खेळला आहे.
गुजरात टायटन्सने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, "१७ वर्षांच्या कारकीर्दीचा अनुभव असलेला टीम इंडियाचा माजी यष्टीरक्षक-फलंदाज पार्थिव पटेल संघासाठी खूप अनुभव आणि ज्ञान घेेऊन येईल.
पार्थिवने मुंबई इंडियन्ससोबतही काम केले आहे. तो मुंबई इंडियन्स एमिरेट्सचा फलंदाजी प्रशिक्षकही होता. पार्थिव पटेलने आयपीएलमध्ये १३९ सामने खेळले आहेत. पार्थिवने या कालावधीत २८४८ धावा केल्या आहेत. त्याने १३ अर्धशतके केली आहेत. पार्थिवची आयपीएलमधील सर्वोत्तम धावसंख्या ८१ धावा आहे.
दरम्यान, पार्थिव पटेल स्वत: गुजरातचा असल्याने खेळाडूंशी त्याचे संबंध आणखी सुधारू शकतात. पार्थिव पटेलने भारताकडून २५ कसोटी, ३८ वनडे आणि दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याने अनुक्रमे ९३४, ७३६ आणि ३६ धावा केल्या आहेत.
पार्थिवच्या खात्यात कोणतेही आंतरराष्ट्रीय शतक नाही, परंतु त्याने कसोटीत ५ वेळा आणि वनडेत ४ वेळा अर्धशतके केली आहेत. पार्थिवने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २०१८ मध्ये खेळला होता.
गुजरात टायटन्स फ्रेंचायझीने आयपीएल २०२५ साठी राशिद खान (१८ कोटी), शुभमन गिल (१६.५० कोटी), साई सुदर्शन (८.५० कोटी), राहुल तेवतिया (४ कोटी) आणि शाहरुख खान (४ कोटी) यांना रिटेन केले आहे. फ्रँचायझीने या खेळाडूंवर एकूण ५१ कोटी रुपये खर्च केले. आता संघाकडे ६९ कोटी रुपये शिल्लक आहेत.