महिला प्रीमियर लीगचा थरार आजपासून सुरु झाला आहे. या मोसमातील पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात जायंट्स आमने सामने आले आहेत. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची कर्णधार स्मृती मानधना हिने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर गुजरात जायंट्सने २० षटकात ५ बाद २०१ धावांचा डोंगर उभारला आहे.
या सामन्यात बेथ मुनी (५६) आणि ॲशले गार्डनर (७९*) व्यतिरिक्त, लॉरा वोल्वार्डने ६ धावा, डेलन हेमलताने ४ धावा, डिआंड्रा डॉटिनने २५ धावा, सिमरन शेखने ११ धावा आणि हरलीन देओलने ९ धावा केल्या.
गुजरातची सुरुवात चांगली झाली. वॉलवार्ड आणि बेथ मुनी यांनी पहिल्या विकेटसाठी ४.३ षटकात ३६ धावा जोडल्या. पण लॉरा वॉलवार्ड बाद झाल्यानंतर दयालन हेमलता काही करू शकली नाही. ती लवकर बाद झाली.
पण बेथ मुनीने आपली फटकेबाजी सुरुच झाली. चौथ्या क्रमांवार कर्णधार ॲशले गार्डनर फलंदाजीस आली होती. तिने आणि बेथ मुनीने आरसीबीच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. बेथ मुनी ४२चेंडूत ५६ धावा करून बाद झाली. तिने आपल्या खेळीत ८ चौकार मारले.
मुनी बाद झाल्यानंतर ॲशले गार्डनरने तुफानी फलंदाजी सुरु केली. तिने अवघ्या ३७ चेंडूत ७९ धावांचा पाऊस पाडला. या खेळीत तिने ८ षटकात आणि ३ चौकार मारले. ती शेवटपर्यंत नाबाद राहिली. शेवटच्या षटकात हरलीन देओलने सलग २ चौकार मारत धावसंख्या २०० च्या पुढे नेली.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून रेणुका सिंगने २ तर कनिका आहुजा, जॉर्जिया वेरहॅम आणि प्रेमा रावत यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
गुजरात जायंट्स- लॉरा वोल्वार्ड, बेथ मूनी (विकेटकीपर), दयालन हेमलथा, ॲश्ले गार्डनर (कर्णधार), डिआंड्रा डॉटिन, हरलीन देओल, सिमरन शेख, तनुजा कंवर, सायली सातघरे, प्रिया मिश्रा, काशवी गौतम.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू- स्मृती मानधना (कर्णधार), डॅनिएल व्याट-हॉज, एलिस पेरी, रघवी बिस्ट, रिचा घोष (विकेटकीपर), कनिका आहुजा, जॉर्जिया वेरेहम, किम गर्थ, प्रेमा रावत, जोशिता व्ही जे, रेणुका ठाकूर सिंग
संबंधित बातम्या