GT Vs SRH IPL 2024 : आयपीएल २०२४ चा १२ वा सामना आज (३१ मार्च) गुजरात टायटन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात खेळला जात आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आयपी चालू मोसमात गुजरात आणि हैदराबाद यांनी प्रत्येकी दोन सामने खेळले असून दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला असून एक पराभव पत्करावा लागला आहे.
गुजरात टायटन्स : ऋद्धिमान शाह (यष्टीरक्षक), शुभमन गिल (कर्णधार), अजमतुल्ला ओमरझाई, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, दर्शन नळकांडे, उमेश यादव, मोहित शर्मा, स्पेन्सर जॉन्सन.
सनरायझर्स हैदराबादः मयंक अग्रवाल, ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट.
गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
त्याचवेळी गुजरातचा कर्णधार शुभमन गिल म्हणाला, की नाणेफेक जिंकली असती तर आम्हीही प्रथम गोलंदाजी केली असती. शुभमनने प्लेइंग-११ मध्ये दोन बदल केले आहेत. डेव्हिड मिलरच्या जागी नूर अहमद तर साई किशोरच्या जागी दर्शन नळकांडे यांनी संधी देण्यात आली आहे.
अहमदाबादमध्ये शुभमन गिलचा रेकॉर्ड चांगला आहे. गिलने अहमदाबादमध्ये १३ आयपीएल डावांमध्ये ६३ च्या सरासरीने ७०० धावा केल्या आहेत. गिलने पाच डावांत ५० हून अधिक धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत गिलला या मैदानावर रोखणे कोणत्याही संघाच्या गोलंदाजांसाठी सोपे नाही.
या हंगामात सनरायझर्स हैदराबादचा फलंदाज हेनरिक क्लासेन आपल्या बॅटने खूप प्रभाव पाडत आहे. त्याने दोन्ही सामन्यात संघासाठी चांगली खेळी केली असून आतापर्यंत १५ षटकार ठोकले आहेत. या वर्षी क्लासेनने T20 फॉरमॅटमध्ये एकूण ५३ षटकार मारले आहेत, जे सर्वाधिक आहे. क्लासेनची खास गोष्ट म्हणजे तो लॉंग ऑफ लॉंग ऑनला सर्वाधिक षटकार मारतो.