Gujarat Titans vs Rajasthan Royals Todays Match : आयपीएल २०२५ चा २३ वा सामना आज (९ एप्रिल) गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जात आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
कर्णधार संजू सॅमसन म्हणाला, की त्यांचा संघ या सामन्यात एका बदलासह आला आहे. वैयक्तिक कारणांमुळे वानिंदू हसरंगा खेळत नाहीये, त्याच्या जागी फजलहक फारुकी याला संधी मिळाली आहे. त्याच वेळी, गुजरातचा कर्णधार शुभमन गिल याने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत.
गुजरात टायटन्स: साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा, इशांत शर्मा.
इम्पॅक्ट प्लेयर: वॉशिंग्टन सुंदर, निशांत सिंधू, अनुज रावत, महिपाल लोमरोर, अर्शद खान.
राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), नितीश राणा, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, जोफ्रा आर्चर, महेश थेक्षाना, फजलहक फारुकी, संदीप शर्मा, तुषार देशपांडे.
इम्पॅक्ट प्लेयर: कुणाल सिंग राठोड, शुभम दुबे, युद्धवीर सिंग चरक, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल.
नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी योग्य आहे. इथे २०० धावा करणे ही मोठी गोष्ट नाही. तथापि, सुरुवातीच्या काळात वेगवान गोलंदाजांना मदत मिळते. आजच्या सामन्यात, नाणेफेक जिंकणाऱ्या कर्णधाराने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पाहिजे, येथे लक्ष्याचा पाठलाग करताना जिंकणे खूप कठीण आहे.
आयपीएलमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आतापर्यंत ३७ सामने खेळले गेले आहेत. या काळात, प्रथम खेळणाऱ्या संघाने १७ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर २० सामन्यांमध्ये लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. या मैदानावरील सर्वोच्च संघ धावसंख्या २४३ आहे, जी पंजाब किंग्जने केली होती.
संबंधित बातम्या