GT Vs RCB IPL 2024 : आरसीबीसमोर २०१ धावांचे लक्ष्य, सुदर्शन-शाहरुखनं झळकावली अर्धशतके
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  GT Vs RCB IPL 2024 : आरसीबीसमोर २०१ धावांचे लक्ष्य, सुदर्शन-शाहरुखनं झळकावली अर्धशतके

GT Vs RCB IPL 2024 : आरसीबीसमोर २०१ धावांचे लक्ष्य, सुदर्शन-शाहरुखनं झळकावली अर्धशतके

Apr 28, 2024 05:30 PM IST

GT Vs RCB IPL 2024 Scorecard : गुजरात टायटन्सने २० षटकांत तीन गडी गमावून २०० धावा केल्या. गुजरातकडून साई सुदर्शन आणि शाहरुख खान यांनी धमाकेदार कामगिरी करत अर्धशतके झळकावली.

GT Vs RCB IPL 2024 Scorecard आरसीबीसमोर २०१ धावांचे लक्ष्य, सुदर्शन-शाहरुखनं झळकावली अर्धशतके
GT Vs RCB IPL 2024 Scorecard आरसीबीसमोर २०१ धावांचे लक्ष्य, सुदर्शन-शाहरुखनं झळकावली अर्धशतके (PTI)

आयपीएल २०२४ च्या ४५व्या सामन्यात गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला विजयासाठी २०१ धावांचे लक्ष्य दिले आहे. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ३ गडी गमावून २०० धावा केल्या आहेत. आरसीबीला विजयासाठी २०१ धावा करायच्या आहेत.

तत्पूर्वी, आरसीबीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर गुजरात टायटन्सने २० षटकांत ३ गडी गमावून २०० धावा केल्या. या सामन्यात साई सुदर्शन आणि शाहरुख खान यांनी धमाकेदार कामगिरी करत अर्धशतके झळकावली. 

सलामीला फलंदाजीला आलेला रिद्धिमान साहा केवळ ५ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याला स्वप्नील सिंगने बाद केले. तर कर्णधार गिल १६ धावा करू शकला. या सामन्यात पुनरागमन करणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलने त्याला बाद केले. 

साई सुदर्शन आणि शाहरुख खान यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी झाली जी सिराजने मोडली. १५ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर या वेगवान गोलंदाजाने शाहरुखला बाद केले. तो ३० चेंडूत १९३ च्या स्ट्राईक रेटने ५८ धावा करून  बाद झाला. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ३ चौकार आणि ५ षटकार आले. त्याने आपल्या T20 कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. त्याने २४ चेंडूत आयपीएलमधील पहिले अर्धशतक झळकावले.

त्याचबरोबर सुदर्शनही मागे राहिले नाहीत. या सामन्यात त्याने आयपीएल कारकिर्दीतील सहावे अर्धशतक झळकावले. यासाठी त्याने ३४ चेंडूंची मदत घेतली. सुदर्शनने मिलरसोबत चौथ्या विकेटसाठी ६९ धावांची नाबाद भागीदारी केली. सुदर्शनने ४९ चेंडूत ८४ धावांची दमदार खेळी केली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ८ चौकार आणि ४ षटकार आले.

त्याचवेळी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या डेव्हिड मिलरने १९ चेंडूंचा सामना करताना २६ धावा काढल्या. आरसीबीतर्फे स्वप्नील सिंग, मोहम्मद सिराज आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर: विराट कोहली, फाफ डुप्लेसिस (कर्णधार), विल जॅक, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरून ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, यश दयाल.

इम्पॅक्ट सब: अनुज रावत, महिपाल लोमरोर, हिमांशू शर्मा, आकाश दीप, विजयकुमार वैश.

गुजरात टायटन्स : ऋद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, शाहरुख खान, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, नूर अहमद, मोहित शर्मा.

इम्पॅक्ट सब: संदीप वारियर, शरथ बीआर, मानव सुथार, दर्शन नळकांडे, विजय शंकर.

Whats_app_banner