IPL 2024: आयपीएलच्या सतराव्या सामन्यात उपगतविजेत्या गुजरात टायटन्सचा सामना पंजाब किंग्सशी होणार आहे. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. आयपीएल २०२४ च्या गुणतालिकेत गुजरातचा संघ पाचव्या आणि पंजाबचा संघ सातव्या स्थानावर आहे. गुजरातने त्यांच्या अखरेच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला आहे. तर, पंजाबला त्यांच्या मागील सामन्यात लखनौ सुपर जायंट्सकडून पराभव स्वीकारावा लागला आहे.
गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात गुरुवारी (४ एप्रिल २०२४) आयपीएलमधील सतरावा सामना खेळला जाईल. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, गुजरात आणि पंजाब यांच्यातील सामना सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल. यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजीसह देशातील इतर भाषांमध्ये पाहू शकतो. जिओ सिनेमा ॲपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल. याशिवाय, https://marathi.hindustantimes.com/ वर सामन्याशी संबंधित बातम्या, लाइव्ह अपडेट्स आणि रेकॉर्डही वाचू शकता.
अहमदाबादची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल आहे. या मैदानावर सहसा फलंदाजांचे एकतर्फी वर्चस्व असते. मात्र, गेल्या सामन्यात खेळपट्टी थोडी संथ होती. चेंडू बॅटवर उशीराने येत होता, त्यामुळे फलंदाजांना शॉट्स मारण्यात अडचणी येत होत्या. या हंगामात झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये एकाही संघाला १७० धावांचा आकडा गाठता आला नाही.
पंजाब किंग्स: शिखर धवन (कप्तान), जॉनी बेयरस्टो, प्रभसिमरन सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), लियाम लिविंगस्टोन, सैम करन, शशांक सिंह, हरप्रीत बरार, हर्षल पटेल, कगिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंह, राइली रोसौ, तनय त्यागराजन, विधाथ कावेरप्पा, हरप्रीत सिंह भाटिया, क्रिस वोक्स, ऋषि धवन, सिकंदर रजा, आशुतोष शर्मा, अथर्व तायडे, नाथन एलिस, शिवम सिंह, प्रिंस चौधरी और विश्वनाथ सिंह.
गुजरात टाइटंस: रिद्धिमान साहा (विकेटेकीपर), शुभमन गिल (कप्तान), साई सुदर्शन, विजय शंकर, डेविड मिलर, अजमतुल्लाह उमरजई, राहुल तेवतिया, राशिद खान, उमेश यादव, नूर अहमद, मोहित शर्मा, दर्शन नालकंडे, रविश्रीनिवासन साई किशोर, शरथ बीआर, मानव सुथार, अभिनव मनोहर, मैथ्यू वेड, केन विलियमसन, जयंत यादव, संदीप वारियर, शाहरुख खान, जोशुआ लिटिल, कार्तिक त्यागी, स्पेंसर जॉनसन और सुशांत मिश्रा.
संबंधित बातम्या