GT vs KKR Head to Head Record : आज गुजरात-केकेआर भिडणार, नरेंद्र मोदी स्टेडियमवर पडणार २५० धावांचा पाऊस?
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  GT vs KKR Head to Head Record : आज गुजरात-केकेआर भिडणार, नरेंद्र मोदी स्टेडियमवर पडणार २५० धावांचा पाऊस?

GT vs KKR Head to Head Record : आज गुजरात-केकेआर भिडणार, नरेंद्र मोदी स्टेडियमवर पडणार २५० धावांचा पाऊस?

May 13, 2024 10:39 AM IST

GT vs KKR Head to Head Record : आयपीएल २०२४ मध्ये आज गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने येणार आहेत. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

GT vs KKR Head to Head Record : आज गुजरात-केकेआर भिडणार, नरेंद्र मोदी स्टेडियमवर पडणार २५० धावांचा पाऊस?
GT vs KKR Head to Head Record : आज गुजरात-केकेआर भिडणार, नरेंद्र मोदी स्टेडियमवर पडणार २५० धावांचा पाऊस?

GT vs KKR Pitch Report : आयपीएल २०२४ च्या ६३ व्या सामन्यात गुजरात टायटन्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे. हा सामना आज (१३ मे) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील KKR संघाने आधीच प्लेऑफचे तिकीट मिळवले आहे. केकेआर संघ प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे.

त्याचवेळी, गुजरात टायटन्स संघ अद्यापही आयपीएल २०२४ च्या प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सला प्लेऑफसाठी पात्र ठरायचे असल्यास उरलेले दोन्ही सामने जिंकणे आवश्यक आहे. 

अशा परिस्थितीत या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टी कशी असेल, ते जाणून घेऊया.

गुजरात वि. केकेआर पीच रिपोर्ट

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीबद्दल बोलायचे झाले तर, येथे फलंदाजांचा वरचष्मा आहे, कारण गेल्या सामन्यात २ शतकी खेळी पाहायला मिळाल्या. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयपीएलचे एकूण ३२ सामने झाले आहेत, ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने १४ वेळा विजय मिळवला, तर नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने १८ वेळा विजय मिळवला.

गुजरात वि. केकेआर हेड-टू-हेड रेकॉर्ड

आयपीएलमध्ये दोन्ही संघ आतापर्यंत एकूण ३ वेळा भिडले आहेत, त्यापैकी गुजरातने २ सामने जिंकले आहेत, तर केकेआरने फक्त एकच सामना जिंकला आहे.

संभाव्य प्लेइंग इलेव्हन

केकेआर संभाव्य इलेव्हन: फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, नितीश राणा, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

गुजरात टायटन्स संभाव्य इलेव्हन-संभाव्य इलेव्हन: शुभमन गिल (कर्णधार), साई सुधारसन, शाहरुख खान, डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, उमेश यादव, मोहित शर्मा, कार्तिक त्यागी.

Whats_app_banner

संबंधित बातम्या