इंग्लंडचे माजी दिग्गज क्रिकेटपटू ग्रॅहम थॉर्प यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. ग्रॅहम थॉर्प यांच्या निधनामुळे क्रिकेट विश्वात शोककळा पसरली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या दोन वर्षांपासून त्यांची तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे ते नैराश्य आणि चिंतेने त्रस्त होते. त्याचवेळी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने ग्रॅहम थॉर्प यांच्या निधनाची घोषणा केली, मात्र त्यांच्या निधनाचे कारण सांगितले नाही.
आता ग्रॅहम थॉर्प यांच्या मृत्यूवर त्यांची पत्नी अमांडा यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल अथर्टनला दिलेल्या मुलाखतीत अमांडा यांनी खुलासा केला की, थॉर्प यांनी मृत्यूपूर्वी स्वत:शी दीर्घ मानसिक आणि शारीरिक लढाई केली होती.
एका वर्तमनात्राने थॉर्प यांच्या पत्नीचा हवाला देत लिहिले आहे की, अलिकडच्या काळात तो खूप आजारी होता आणि प्रत्यक्षात आपण त्यांच्याशिवाय चांगले जगू असे त्यांना वाटायचे. पण त्यांनी जीव गमावला आणि आम्ही उद्ध्वस्त झालो. ती पुढे म्हणते की, ग्रॅहम गेल्या काही वर्षांपासून नैराश्य आणि चिंतेने त्रस्त होते, त्यामुळे मे २०२२ मध्ये त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, त्यामुळे त्यांना अनेक दिवस अतिदक्षता विभागात घालवावे लागले. त्यांना नैराश्य आणि चिंतेने ग्रासले होते जे कधीकधी खूप गंभीर व्हायचे".
ग्रॅहम थॉर्प १९९३ ते २००५ पर्यंत इंग्लंडकडून खेळले. १०० कसोटी सामन्यांव्यतिरिक्त या क्रिकेटपटूने ८२ एकदिवसीय सामन्यांमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले. ग्रॅहम थॉर्पने कसोटी सामन्यांमध्ये १६ शतके ठोकली आणि ३८ वेळा पन्नास धावांचा टप्पा पार केला. याशिवाय त्यांनी वनडे फॉरमॅटमध्ये २३८० धावा केल्या आहेत. तसेच २१ अर्धशतके झळकावली.