Gongadi Trisha : भारतीय फलंदाजानं इतिहास रचला, गोंगडी त्रिशा ठरली या ICC स्पर्धेत शतक करणारी पहिली खेळाडू
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Gongadi Trisha : भारतीय फलंदाजानं इतिहास रचला, गोंगडी त्रिशा ठरली या ICC स्पर्धेत शतक करणारी पहिली खेळाडू

Gongadi Trisha : भारतीय फलंदाजानं इतिहास रचला, गोंगडी त्रिशा ठरली या ICC स्पर्धेत शतक करणारी पहिली खेळाडू

Jan 28, 2025 02:26 PM IST

Gongadi Trisha Century: भारताच्या गोंगडी त्रिशा हिने अंडर १९ टी-20 वर्ल्डकपमध्ये शतक केले आहे. या स्पर्धेच्या इतिहासातील हे पहिलेच शतक आहे आणि ही कामगिरी भारता

भारताच्या गोंगडी त्रिशाने इतिहास रचला,  या ICC स्पर्धेच्या इतिहासातील पहिलं शतक झळकावलं
भारताच्या गोंगडी त्रिशाने इतिहास रचला, या ICC स्पर्धेच्या इतिहासातील पहिलं शतक झळकावलं

India Women U19 vs Scotland Women U19 : भारतीय फलंदाजाने आयसीसी अंडर-१९ महिला टी-20 स्पर्धेत इतिहास रचला आहे. गोंगडी त्रिशा असे या फलंदाजाचे नाव आहे. गोंगडी त्रिशा हिने महिलांच्या अंडर १९ वर्ल्डकपमध्ये शतक ठोकले आहे. तिने स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात ५३ चेंडूत शतक झळकावले.

त्रिशा शेवटपर्यंत नाबाद राहिली आणि तिने ११० धावा केल्या. तिने ५९ चेंडूत १३ चौकार आणि ४ षटकार खेचले. गोंगडी त्रिशा हिचे हे शतक खूपच खास आहे. कारण या स्पर्धेत आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाला शतक झळकावता आले नव्हते. महिलांच्या अंडर १९ वर्ल्डकपमध्ये शतक करणारी गोंगडी त्रिशा ही पहिली फलंदाज ठरली आहे.

या शतकाच्या बळावर त्रिशाने भारतीय धावसंख्या २०० च्या पुढे नेली. तसेच, ती स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली आहे.

तत्पूर्वी, या सामन्यात स्कॉटलंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर भारताने फलंदाजी करताना चांगलीच धमाल केली. भारतीय फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला.

कमलिनीसोबत सलामीला आलेल्या त्रिशाने सुरुवातीपासूनच आक्रमण करत स्कॉटिश गोलंदाजांवर दबाव कायम ठेवला. कमलिनीच्या बॅटमधूनही धावा निघत होत्या पण त्रिशा ज्या गतीने फलंदाजी करत होती, ते पाहून स्कॉटलंडची अवस्था केविलवाणी झाली होती.

या दोघींमध्ये सलामीच्या विकेटसाठी १४७ धावांची मोठी भागीदारी झाली, ज्यामुळे भारताला जबरदस्त सुरुवात मिळाली. सलामीची जोडी तुटल्यानंतरही गोंगडी त्रिशाने आक्रमक फलंदाजी सुरुवच ठेवली आणि शतक पूर्ण केले. त्रिशाच्या शतकाच्या बळावर भारताने २० षटकात १ बाद २०८ धावा फटकावल्या.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

भारत- जी कमलिनी (विकेटकीपर), गोंगडी त्रिशा, सानिका चाळके, निकी प्रसाद (कर्णधार), ईश्वरी अवसरे, मिथिला विनोद, भाविका अहिरे, आयुषी शुक्ला, शबनम मो. शकील, वैष्णवी शर्मा, सोनम यादव.

स्कॉटलंड- पिप्पा केली, एम्मा वॉल्सिंगहॅम, पिप्पा स्प्रॉल (विकेटकीपर), नियाम मुईर (कर्णधार), नायमा शेख, शार्लोट नेवार्ड, अमेली बाल्डी, गॅब्रिएला फॉन्टेनला, मैसी मॅसिरा, मोली पार्कर, कर्स्टी मॅकॉल.

Whats_app_banner

संबंधित बातम्या