Melbourne Renegades vs Melbourne Star : बिग बॅश लीग २०२५ च्या ३२ व्या सामन्यात आज (१२ जानेवारी) ग्लेन मॅक्सवेलने आपल्या तुफानी फलंदाजीने धुमाकूळ घातला. मेलबर्न स्टार्सच्या या स्फोटक फलंदाजाने मेलबर्न रेनेगेड्सविरुद्ध ५२ चेंडूत ९० धावांचा पाऊस पाडला. या खेळीत मॅक्सवेलनने १० षटकार आणि ४ चौकार मारले.
यादरम्यान मॅक्सवेलने १२२ मीटर लांब षटकार ठोकला. हा षटकार एवढ्या लांबवर गेल्याने स्वतः मॅक्सवेलही आश्चर्यचकित झाला. आता मॅक्सवेलच्या या सिक्सरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या सामन्यात मेलबर्न रेनेगेड्स संघाने नाणेफेक जिंकून स्टार्सला प्रथम फलंदाजी करण्यास सांगितले. मेलबर्न रेनेगेड्सच्या गोलंदाजांनी स्टार्सविरुद्ध धमाकेदार सुरुवात केली आणि अवघ्या ७५ धावांत ७ विकेट्स घेतल्या. मात्र यानंतर मॅक्सवेलने रेनेगेड्सच्या गोलंदाजांची अवस्था बिकट झाली.
मेलबर्न स्टार्सने अवघ्या ७५ धावांत ७ विकेट्स गमावल्या होत्या. यानंतर ग्लेन मॅक्सवेलने स्टार्ससाठी दमदार फलंदाजी केली आणि संघाला सामन्यात परत आणले. मॅक्सवेलने एकहाती संघाची धावसंख्या १५८ धावांपर्यंत नेली. तो शतकाच्या जवळ आल्यानंतर त्याला केन रिचर्डसनने बोल्ड केले.
मॅक्सवेलचे शतक थोडक्यात हुकले, पण संघाला १६५ धावांपर्यंत पोहोचवण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली.
गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर मेलबर्न रेनेगेड्सकडून टॉम रॉजर्स, फर्गस ओ'नील, ॲडम झाम्पा आणि केन रिचर्डसन यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. याशिवाय जेकब बेथलच्या खात्यात एक विकेटही पडली. या सामन्यात रेनेगेड्स संघाच्या गोलंदाजांनी दमदार सुरुवात केली होती, पण मॅक्सवेलच्या स्फोटक फलंदाजीने त्यांची मेहनत पूर्णपणे वाया गेली.
संबंधित बातम्या