GG vs MI WPL 2024 : मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा विजय, गुजरातचा ५ विकेट्सनी धुव्वा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  GG vs MI WPL 2024 : मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा विजय, गुजरातचा ५ विकेट्सनी धुव्वा

GG vs MI WPL 2024 : मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा विजय, गुजरातचा ५ विकेट्सनी धुव्वा

Feb 25, 2024 10:52 PM IST

GG vs MI WPL 2024 : महिला प्रीमियर लीगचा तिसरा सामना आज (२५ फेब्रुवारी) गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात मुंबईने सहज विजय मिळवला.

GG vs MI WPL 2024
GG vs MI WPL 2024 (PTI)

Gujarat Giants Vs Mumbai Indians WPL 2024 : महिला प्रीमियर लीगचा तिसरा सामना आज रविवारी (२५ फेब्रुवारी) गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर मुंबईने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.

यानंतर गुजरातने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ९ बाद १२६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईने १८.१ षटकात ५ बाद १२९ धावा करून सामना जिंकला. 

एमआयच्या या विजयात कर्णधार हरमनप्रीत कौरचे महत्त्वाचे योगदान होते. तिने ४६ धावांची नाबाद खेळी खेळली. तिने ५ चौकार आणि १ षटकार मारला. या खेळीत यात तिला अमेलिया कारने मोलाची साथ दिली. दोघींमध्ये ५० चेंडूत ६६ धावांची भागीदारी झाली.  अमेलिया केरने २५ चेंडूत ३१ धावांचे योगदान दिले.

गुजरात जायंट्सचा डाव

टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी अतिशय धारदार गोलंदाजी केली. गुजरातचे सर्वच फलंदाज मुंबईच्या गोलंदाजांसमोर झुंजताना दिसले. 

सलामीला फलंदाजीला आलेली वेदा कृष्णमूर्ती पहिल्याच षटकात शुन्यावर तंबूत परतली. यानंतर कर्णधार बेथ मुनीने २४, हरलीन देओलने ८, फोबी लिचफिल्डने ७, ऍशले गार्डनरने १५, तनुजा कंवरने २८ धावा केल्या. तर कॅथरीन ब्राइस २५ धावा करून नाबाद राहिली.

मुंबई इंडियन्सकडून शबनीम इस्माईलने ३, अमेलिया कारने ४ फलंदाज बाद केले. तर नॅट सिव्हर ब्रंट आणि हेली मॅथ्यूज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या